DMCC केंद्राच्या वतीने शिष्यवृत्तीधारकांच्या कार्यक्रमाचे आयोजन


◽ मख़दुम समाचार ◽
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १ मे २०२३
    दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि नृत्य यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते तसेच त्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवारी दि. ६ मे आणि रविवारी दि ७ मे या दिवशी आयोजित केला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यात सहभागी गायकांना तबला साथ प्रवीण करकरे यांचे शिष्य आणि केंद्राचे शिष्यवृत्तीधारक यज्ञेश कदम आणि निनाद कुणकवळेकर करणार असून हार्मोनियमची साथ ओंकार अग्निहोत्री आणि शुभदा गायकवाड यांची असेल. 
     दि. ६ मे रोजी सकाळी १० ते १.३० या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे - भरतनाट्यम नृत्य (गुरु - स्नेहल कळमकर), कनिष्का पोवळे -  गायन (गुरु - प्रतिमा टिळक), सिद्धी शितुत - गायन (गुरु - वरदा गोडबोले),  आसावरी गोंधळी - गायन (गुरु - पं. अरुण कशाळकर), अदिती पोटे - गायन – (गुरु - अपूर्वा गोखले) हे कला सादर करतील तर दि. ७ मे संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात सावनी पारेकर - ख्याल गायन (गुरु - पल्लवी जोशी), आर्या धारेश्वर - गायन (गुरु - यशस्वी सरपोतदार), प्राजक्ता शेंद्रे - गायन (गुरु - श्रीमती पल्लवी जोशी), सावनी गोगटे - गायन - गुरु (पं. शुभदा पराडकर) यांची कला सादर होईल,
असे संयोजकांनी कळविले आहे.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा