आंतरिक शांती, मानसिक संतुलनासाठी सहजयोग ध्यानसाधना उपयुक्त - सिताराम काकडे; आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त सहज प्रदर्शन संपन्न !


▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी)  २२.६.२०२३
      प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित अहमदनगर जिल्हा सहजयोग समितीच्या वतीने नेहरूमार्केट मैदान, चितळेरोड येथे सहज प्रदर्शन व कुंडलिनी जागृती कार्यक्रमाचे उदघाटन सीताराम काकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सहजयोग राज्य समिती सदस्य अंबादास येन्नम, जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, मेजर कुंडलिक ढाकणे, निवृत्त सहा. पो. उपनिरीक्षक आबासाहेब दांगडे व लक्ष्मण अंदे, मा. नगरसेविका वीणाताई बोज्जा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
     यावेळी सीताराम काकडे म्हणाले संपूर्ण जगात आज योग दिन साजरा करतात. वास्तविक भारत देशाला योगाचा प्राचीन परंपरा लाभलेला असून संपूर्ण जगाने भारताचे योगाचे अनुकरण केले आहे. योग म्हटले की शारीरिक कवायती, प्राणायाम वगैरे असते परंतु सहजयोगा मध्ये कोणतीही शारीरिक कवायती नसून प्राणायाम सुद्धा नाही. निर्विचारतेत ध्यान साधना केल्याने आंतरिक शांती व मानसिक संतुलन प्राप्त होते यासाठी आजच्या काळात प्रत्येक मानवाने सहजयोग ध्यान साधना करणे गरजेचे आहे.
    यावेळी इंजि.अंबादास येन्नम म्हणाले कोविड विषाणूचा प्रभाव संपल्यानंतर जगामध्ये मनोविकाराच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली. यासाठी आजारातून बाहेर पडण्यासाठी सहजयोग ध्यान धारणा अत्यंत उपयुक्त आहे.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी सहजयोगाबद्दल माहिती दिली.
      कार्यक्रमाची सुरुवात प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन करून सहज प्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन मेजर कुंडलिक ढाकणे यांनी स्वागत राहुल सातपुते यांनी केले तर आभार शहर समन्वयक लक्ष्मण अंदे यांनी मानले.
या कार्यक्रमाचा लाभ ५०० पेक्षा जास्त साधकांनी घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवीद्र आगरकर, नीरज सातपुते, रमेश डाके, गिते साहेब, विनायक जोग, योगेश सूर्यवंशी, गजेंद्र सांगळे, संजय संभार, नितीन देवाळकर, मनोहर अंकम, गणेश कोडम, अविनाश आडेप, मनी दुगगल, मनोज बनसोडे, तृप्ती आगरकर, उन्नती द्यावनपेल्ली, पूर्वजा बोज्जा, प्रिया कोडम, भक्ती संभार, बनसोडे, तोगे, गायकवाड, संदुपटाला, धायडे, संभार,  जाधव आदींनी पुढाकार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा