आंबेडकरी समाजाच्या वतीने स्टेट बँक चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण फलकचे अनावरण !


▫️मख़दुम समाचार▫️ 
   अहमदनगर (प्रतिनिधी) २१.६.२०२३
शहरातील स्टेट बँक चौक नसून हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव असून नावाचे फलक रस्त्याच्या उजव्या बाजूला अनेक वर्षापासून लावलेले होते. व उड्डाणपुलाच्या कामानिमित्त नावाचे फलक काढण्यात आले असून अनेक वेळा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा आयुक्त यांना सांगून देखील फलक लावण्यात आले नसून समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने स्वखर्चातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरणाचा फलक लावण्यात आला आहे व अहमदनगर महानगरपालिकेने नव्याने सभेत ठराव मंजूर करून घेऊन मनपाच्या वतीने लवकरात लवकर फलक लावून सुशोभीकरण करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली.
      यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, किरण दाभाडे, सिद्धार्थ आढाव, योगेश साठे, नगरसेवक राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड, प्रा.जयंत गायकवाड, विशाल गायकवाड, अक्षय भिंगार दिवे, जय भिंगार दिवे, नितीन कसबेकर, विजय गव्हाळे, विशाल गायकवाड, सचिन शेलार, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, अमित काळे, शैनेश्वर पवार, आकाश तांबे, अक्षय गायकवाड, अक्षय पाथरीया, शादुल भिंगारदिवे, शिवम भिंगारदिवे, अर्जुन पाखरे, दया गजभिये, अक्षय नरवडे, चिकू गायकवाड, अक्षय बोरुडे, शेखर पंचमुख, लखन गायकवाड, मोना विधाते, रामा काते, मंगेश मोकळ, बंटी भिंगारदिवे, अतुल भिंगारदिवे, प्रकाश भिंगारदिवे, विशाल गायकवाड, किरण जाधव, प्रवीण मोरे, सनी माघाडे, जय कदम, किशोर कुमार, दीपक अमृत, संदीप वाघचौरे, पवन भिंगारदिवे, स्वप्निल भिंगारदिवे, कृपाल भिंगारदिवे आदीसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा