शहरातील धावपटूंची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी कौतुकास्पद – आ.संग्राम जगताप; धावपटू जायभाय, खरपुडे, मकर, भोजने यांचा सत्कार संपन्न !


मख़दूम समाचार

अहमदनगर (लहू दळवी) २५.६.२०२३

 सध्याचे युग स्पर्धेचे असून यात टिकून राहण्यासाठी जिद्दी चिकाटी व मेहनतीची खरी गरज आहे, आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याच्या दृष्टीने क्रिडा क्षेत्राला खूपच महत्व प्राप्त झाले असून अहमदनगरची ओळख कला, क्रिडा व सांस्कृतिक वारसा जपणारी आहे, यात विविध खेळाच्या माध्यमातून अहमदनगरच्या खेळाडूंनी जागतिक पातळीवर आपले नाव कमावले आहे, नुकतेच दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगरच्या गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने या ४ खेळाडूंनी अहमदनगर शहराचा नावलौकिक वाढविला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो. तरी विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळावे, अहमदनगर शहरात विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी २ क्रिडा संकुलाची निर्मिती होणार आहे, यासाठी सारसनगर परिसरात काम सुरु आहे, आणि लवकरच सावेडी उपनगरात सुरु होईल, या ठिकाणी खेळाचे योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे, या माध्यमातून नक्कीच खेळाडू आपल्या आवडीच्या क्रिडा प्रकारात नावलौकिक मिळवतील. अहमदनगर शहरातील धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे असे आ.संग्राम जगताप यांनी केले.

 दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या अहमदनगरचे धावपटू गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला यावेळी ते बोलत होते, याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाकार्यध्यक्ष अभिजित खोसे, अमृत पितळे, विजय फुलसौंदर, दिनेश जोशी, अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे नितीन पाठक, अमोल कुलकर्णीमनोज यनगंदूलजूनेद शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

  गौतम जायभाय म्हणाले की, आपली शारीरिक क्षमता चांगली असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते, आम्ही चारही खेळाडूंनी केलेल्या कामगिरी बद्दल आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक करत आमचा सत्कार केला यातून आम्हांला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे, शहरातील खेळाडूंनी मेहनतीच्या जोरावर आपल्या आवडीच्या क्रिडा क्षेत्रात यश संपादित करावे, क्रिडा क्षेत्रात करियर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा