मख़दूम समाचार अहमदनगर (प्रतिनिधी) २५.६.२०२३
परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या उप निर्देशित प्रस्तावास अनुसरून अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढ करून प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर करण्यास शासन निर्णयाप्रमाणे मान्यता देण्यात आली व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना नमूद प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले असून वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघटनेच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नवेद शेख, सल्लागार जय बोगावत, मनोज मेहेर, रवी जोशी, मतीन शेख, सरफराज खान, गणेश राजानी, तौसिफ शेख, वसीम शेख, गणेश शेळके, सनी वाघमारे आधी सह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
إرسال تعليق