आरोग्य क्षेत्रात सकारात्मक कामाची गरज - संध्या मेढे; रुग्णांच्या हक्काच्या लढ्यासाठी 'जन आरोग्य समिती' स्थापन !



▫️मख़दुम एक्स्प्रेस▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) १२.६.२०२३
 येथील रहेमत सुलतान हॉलमधे जन आरोग्य समितीची बैठक संपन्न झाली. समितीमध्ये नाशिक येथील प्रमुख वक्ते संतोष जाधव उपस्थित होते. जाधव हे समिती नाशिकचे संस्थापक आहेत. बैठकीची प्रस्तावना संध्या मेढे यांनी केली. त्यांनी रुग्णांना होणारा त्रास व खाजगी रुग्णालयातून होणारी आर्थिक लूट याबद्दल सांगत समितीची अहमदनगरमध्ये फार आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.            यावेळी संतोष जाधव यांनी आरोग्य क्षेत्रातील वर्तमान अवस्थेचा थोडक्यात आढावा घेतला. महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा २०२१ विषयी माहिती दिली. तसेच नाशिक, सांगली, पुणे येथील अनुभव यशस्वी उदाहरणे देऊन सांगितला. उपस्थितांची प्रश्नोत्तरे झाली.
     बॉम्बे नर्सिंग होऊन कायदा २०२१ आणि आरोग्य विषयक कायद्यांच्या अंमलबजावणी करिता कार्य करणे आवश्यक आहे. ही काळाची गरज देखील आहे. म्हणून अहमदनगर येथील समितीला सुद्धा जन आरोग्य समिती अहमदनगर हे नाव देण्यात आले. याचा विस्तार पुढील सहा महिन्यांमध्ये करू तोपर्यंत आज होणारी निवड ही पुढील सहा महिनेपर्यंत कायम राहील, असे सर्वानुमते ठरले.
     समितीच्या जिल्हा समन्वयकपदी दीपक पाचपुते तर  नदिरखान नूरखान, संध्या मेढे, अनिल भोसले, कारभारी गरड हे सदस्य म्हणून काम पाहतील. समितीचा कृती कार्यक्रम असा असेल. शहर पातळीवर जिल्हाधिकारी, आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधने, निवेदन देणे. zp ceo and dho यांच्याशी संवाद साधणे आणि निवेदन देणे. IMA तसेच खाजगी दवाखाने मालक संघटनेबरोबर संवाद आणि निवेदन देणे. लोकांमध्ये रुग्ण हक्क सनद, दरपत्रक आणि तक्रार निवारण कक्ष संदर्भात जनजागृती कार्यक्रम करणे. जिल्हा समन्वयक गटाशी बोलून समितीची बैठक/कार्यशाळा तारीख लवकर जाहीर करतील.
    बैठकीस युनूस तांबटकर, तुषार रणनवरे, गणेश कराळे, विनायक गोरखे, सचिन भिंगारदिवे, रमेश शेंडाळे, सचिन भस्मे, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा