◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (लहू दळवी) १२.६.२०२३
प्रभाग क्रमांक दोनच्या विकासकामांना निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, सभागृह नेते विनीत पाअुलबुधे यांनी पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून घेतला व कायमस्वरूपीचे नियोजनबद्ध विकास कामे मार्गे लावल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. श्रीकृष्ण नगर, वैष्णवी कॉलनी, नंदनवन कॉलनी, जय हिंद चौक, दळवी मळा परिसरातील विकास कामांची पाहणी करीत असताना नागरिकांनी पुढे येऊन ठिकठिकाणी आमचे स्वागत केले आम्ही विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनामधील समाधान पूर्ण करण्याचे काम करत आहे. प्रभागाच्या विकास कामाचे नियोजन करून नागरिकांचे कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लागत आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभाग क्रमांक दोन मधील विकासाची कामे पूर्ण होऊन समस्या मुक्त प्रभाग म्हणून ओळखला जाईल, दर्जेदार विकास कामाच्या माध्यमातून प्रभागाच्या सुशोभीकरणात व सौंदर्यात भर पडत आहे, प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवकांनी केलेली विकास कामे पाहून मनाला समाधान वाटत आहे, नागरिकांच्या सहकार्यातूनच विकासाची कामे मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका रूपालीताई वारे यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी मा. नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, राजेंद्र चेमटे, राहुल जोशी, डॉ. धूत, सचिन गोटे, नाना नागरगोजे, प्रशांत पवार, अभिषेक गोटे, हेमंत बल्लाळ, सुधाकर देशपांडे, मच्छिंद्र तुवर, सतीश शहा, भूषण अनुभुले, युवराज बार्शीकर, अमोल आंधळे, खिलारी, निमसे, गायके, एकशिंगे,चौरे, कुताळ, अकोलकर, ढोले, बांगर, गोरे, कर्डिले, अनिल आठरे, अजय दारकुंडे, लवली गुप्ता, रितेश सोनटक्के, राजेंद्र डाके, रुपेश यादव आदी उपस्थित होते.
मा. नगरसेवक निखिल वारे म्हणाले की प्रभाग क्रमांक दोन मध्ये नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावली जात असल्यामुळे प्रभागाचा शाश्वत विकास होताना दिसत आहे एकदा केलेली विकास कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नसल्यामुळे विकास कामातून प्रभागाचे रूप बदलताना दिसत आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागांमध्ये विकास कामे सुरू आहेत. आम्ही चारही नगरसेवक प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर असून टप्प्याटप्प्याने सर्व विकास कामे मार्गी लावले जातील. विकास कामातून नक्कीच मॉडेल प्रभाग म्हणून ओळखला जाईल असे ते म्हणाले.
إرسال تعليق