मख़दूम समाचार
परभणी (प्रतिनिधी) २७.६.२०२३
येथील साहित्यिक तथा एकता फाउंडेशन, जिल्हा कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश वाकळे यांना नुकताच साहित्यभूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निळे प्रतीक या संस्थेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
प्रा. वाकळे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उल्लेखनीय योगदान पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण ता.२९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक सभागृहात संस्थेच्या वर्धापनदिन सोहळ्यात करण्यात येणार आहे.
प्रा. प्रकाश वाकळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे अहमदनगर येथील वाकळे मंडळींनी त्यांचे हार्दीक अभिनंदन केले आहे.
إرسال تعليق