सामाजिक सलोखा, समता, बंधूता टिकविणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य - पद्मश्री पोपट पवार; ईद मिलन कार्यक्रम संपन्न !


मख़दूम समाचार 
अहमदनगर (विजय मते) २६.६.२०२३
      भारतात सर्व धार्मिक उत्सव, सण मोठया उत्साहात साजरे होतात.विविध धर्मातील लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत मात्र अलिकडे समाजा- समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे. सर्व धर्मियांना एकत्र बोलावून सामाजिक सलोखा, समता बंधूता टिकविणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
      अहमदनगर येथील समस्त मुस्लिम डॉक्टर्स व सहकाऱ्यांच्या वतीने  ईद-मिलन कार्यक्रमा प्रसंगी सर्व धर्मीय, डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदि मान्यवर नागरिकांसमोर ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ.बापुसाहेब कांडेकर, डॉ.एस.एस. दीपक, डॉ.रफिक सय्यद, डॉ. सचिन महांडूळे, डॉ.किरण दिपक, डॉ.नदीम शेख, डॉ.एम.के.शेख, डॉ.माजीद, डॉ.सईद शेख, डॉ. जहीर मुजावर, ऐसाचे अध्यक्ष अन्वर शेख,अ‍ॅड. फारुक बिलाल आदि उपस्थित होते.
      पद्मश्री पवार पुढे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांनाच आपण शतक महोत्सवाचे स्वप्न पाहतोय मात्र दोन धर्मामध्ये वाद जर असाच राहिला तर त्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याचे फलित काय? तेंव्हा प्रत्येकाने या विषयावर चिंता करुन चिंतन करावे. एकमेकांविषयी माणुसकी धर्म पाळावा म्हणजे, समाजात एकीचे बळ वाढेल, असे सांगितले.
     अध्यक्षीय भाषणात डॉ.रफिक सय्यद यांनी हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा. ईद-मिलन म्हणजे स्नेह बंधू-भाव वाढीसाठी हा कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा होतो. समाजकंटक जे नारे देतात कि ‘हिंदू भी खतरे में है..मुस्लिम भी धोके में है... उनको मैं बताना चाहता हूँ एन.आर. लॉन मे आकर देखे हिंदू भी मजेमे हैं मुस्लिम भी मजे मे हैं, हा शायद किसी की खुर्ची हैं जो खतरेमे हैं, हे सांगताच सर्वांनी  टाळ्यांचा कडकडाट करून साद दिली.
      यावेळी डॉ. रफीक सय्यद यांनी पैगंबरांच्या वाडमयातील सुंदर उदाहरणे देऊन सांगितले की, मानवजातीमध्ये हिंदु मुस्लिम एकाच नौकेतील प्रवासी समान आहे व या नौकेत समाज विरोधक शक्ति छेद करुन नौका बुडविण्याचा घात करत आहे. ज्यामुळे हिंदू मुस्लिम दोघांची हानी होईल. हे समाजाने ओळखले पाहिजेत असे ते म्हणाले.
    डॉ.बापुसाहेब कांडेकर, डॉ.दीपक, डॉ.सचिन महांडूळे, डॉ.मार्सिया वॉरन, डॉ.आनंद शितोळे, डॉ.सतीश सोनवणे आदिंनी राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी  सर्वांची एकजूट महत्वाची असल्याचे आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. प्रहार अ‍ॅकॅडमीच्यावतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सुत्रसंचालन डॉ. निखिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ माजीद यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा