एम.एस्सी. द्वितीय सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी एआयएसएफ'ने घेतली रा.तु.म. विद्यापीठ कुलगुरू सुभाष चौधरींसह प्र-कुलगुरू संजय दुधे यांची भेट !

मख़दुम समाचार
नागपुर (प्रतिनिधी) २४.६.२०२३
     ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या शिष्टमंडळाने आज रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यपीठाचे कुलगुरू सुभाष चौधरींसह प्र-कुलगुरू संजय दुधे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. विद्यापीठाने एम.एस्सी. द्वितीय सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली. या विषयावर सविस्तर चर्चा केली असता, परीक्षा नियंत्रकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरू सुभाष चौधरी व  प्र-कुलगुरू संजय दुधे यांनी दिले.       
नागपूर विद्यापीठाची एम.एस.सी. द्वितीय सत्राची उन्हाळी परीक्षा दि. २७ जून रोजी सुरू होणार आहे. नुकतीच १० एप्रिल रोजी प्रथम सत्राची हिवाळी परीक्षा पार पडली. त्याचे निकाल २३ में रोजी जाहिर झाले होते. लगेच ३० में रोजी उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक विद्यपीठाने जाहीर केले. अवघा एक महिन्यात ही उन्हाळी परीक्षा विद्यापीठ घेत आहे. यामुळे हजारो विद्यार्थी नापास होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही महाविद्यालयाने अभ्यासक्रम पूर्ण केला नाही व विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ दिला नाही. त्यामुळे अभ्यास करायला वेळ मिळावा म्हणून हि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ऑल इंडिय स्टुडंट्स फेडरेशनने यावेळी केली आहे. 
 कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या अध्यक्षतेखाली भेटलेल्या शिष्टमंडळात राज्य कौन्सिल सदस्य रवी बावणे, मीनाक्षी मेहर, विश्वजित बनकर, वैष्णवी मेश्राम, दामिनी नंदेश्वसर, मयुरी डहाके, रेणुका पाटणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा