◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी) २१.६.२०२३
येथील महानगरपालिकेच्या केडगाव उपनगरातील प्रथम आय.एस.ओ.मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गरम्य शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी विद्यार्थ्यांना विविध योग प्रकारांचे व प्राणायामांचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच प्रत्येक योग प्रकाराचे व प्राणायामाचे आपल्या शरीराला होणारे फायदे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून सर्व योगासनाच्या व प्राणायामाच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करून घेतले.
सहशिक्षक शिवराज वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय योगदानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवित वाघमारे, उपाध्यक्ष सविता लोखंडे, सदस्य रविंद्र पानसरे, शिलाबाई देसाई उपस्थित होते. श्री आयटी कॉम्प्युटर्सच्या विनायक ससे यांनी विद्यार्थ्यांना योगासने करण्यासाठी चार मोठ्या चटया शाळेस भेट दिल्या. सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
إرسال تعليق