विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता दररोज वेगवेगळे शिक्षण आत्मसात करावे - आ.संग्राम जगताप; गवांदे क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !


▫️ मख़दुम समाचार  ▫️
अहमदनगर (लहू दळवी) २१.६.२०२३
    शालेय शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेले असून गवांदे क्लासच्या माध्यमातून जिल्हाभरातील विद्यार्थ्याना घडविण्याचे काम करत आहे, प्रा. प्रभाकर गवांदे यांनी अवघड असलेल्या    गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करत विश्वास संपादित केला. विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून जिद्द मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते, विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता दररोज आपल्याला वेगवेगळे शिक्षण मिळत असते ते आत्मसात करावे. गवांदे क्लासेसने शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, १० वी व १२ वी हा विद्यार्थ्यांच्या करियरसाठी मुख्य पाया आहे, त्याला योग्य मार्गदर्शन लाभल्यास तो आपल्या जीवनात यशस्वी होवू शकतो. शिक्षण क्षेत्रात करियरसाठी विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे, गवांदे क्लासेसच्या माध्यमातून वर्षभर करियर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असते प्रा.प्रभाकर गवांदे सर हे गणित विषयात विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे करत असलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.      
   गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी १२ वी बोर्ड, MHT-CET आणि JEE परीक्षेत घवघवीत यश मिळवल्या बद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन कार्यशाळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. या प्रसंगी प्रा.प्रभाकर गवांदे, प्रा. यशोधन सोमण, प्रा. केदार टाकळकर, छाया गवांदे, प्रा.प्रमोद ढगे, प्रा. विवेक चौधरी, प्रा. सुरेश जावळे, सुनिता झिंजाड, सोनाली वाबळे, माणिक विधाते, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप, गजेंद्र भांडवलकर यांच्यासह विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.    
  प्रा.प्रभाकर गवांदे म्हणले की,१२ वी बोर्ड परिक्षेत ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९० पेक्षा जास्त गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. MHT-CET  म्हणजेच अभियांत्रिकेच्या प्रवेश परिक्षेत गवांदे क्लासेसच्या ३२ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळविले. २८ विद्यार्थी JEE (Advance) म्हणजेच IIT च्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरले. गवांदे क्लासेसने मागील २० वर्षापासुन निकालाची उच्च परंपरा या वर्षीही कायम जोपासली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक करणे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना प्रोत्साहित करणे आपले कर्तव्य आहे, समाजात आपण वावरत असताना चांगला विद्यार्थी घडवण्याचे कार्य आपण सर्वजन मिळून करू. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देत आपले उज्वल भविष्य घडवावे असे ते म्हणाले.
      यावेळी इंजिनियरिंग व मेडिकल क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याना प्रा. यशोधन सोमण आणि प्रा. केदार टाकळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी लाटे आणि मयुरी लगड यांनी केले, तर आभार प्रा. सुरेश जावळे यांनी मानले.






Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा