भारतातील उच्च दर्जाचे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्टील - रोहित मानधनी; आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. सभासदांची उपस्थिती; एस आर जे स्टील कंपनीचा नामांतर सोहळा संपन्न!



▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) २२.६.२०२३ 
 अहमदनगर जिल्हा हा देशात प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, या जिल्ह्यामध्ये बांधकाम क्षेत्राने भरारी घेतली आहे. शहराच्या वैभवात भर पडेल अशा इमारती उभ्या राहत आहे यामध्ये श्री ओम स्टीलचे मोठे योगदान असून ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे, देश पातळीवरील नामांकित स्टील कंपनीमधील श्री ओम स्टीलचे नामांतर एस आर जे स्टील असे करून हा सोहळा शहरात आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. सभासदांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे, देश पातळीवरील नामांतर सोहळा हा अहमदनगर शहरात होतो ही बाब अभिमानास्पद आहे. एस आर जे स्टील हे भारतातील उच्च दर्जा असलेले आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सर्वोत्तम स्टील आहे असे प्रतिपादन व्हॉइस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग रोहित मानधनी यांनी केले.  
   श्री ओम स्टील या ग्राहकांच्या प्रसिद्धीमध्ये उतरलेल्या स्टीलचे आता एस आर जे स्टील या नवीन नावाने  नामकरण सोहळा अहमदनगर मधील आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहमदनगरच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास व्हॉइस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग रोहित मानधनी, एसाचे अध्यक्ष अन्वर शेख, उपाध्यक्ष रमेश कार्ले, सचिव प्रदिप तांदळे, वैभव फिरोदिया, प्रकाश जैन, विनोद काकडे, प्रितेश पाटोळे, मकरंद देशपांडे, इक्बाल सय्यद, अजय दगडे, सुनिल हळगावकर एस आर जे स्टीलचे अहमदनगर मधील डीलर पुरुषोत्तम मानधना, किशोर ससे, प्रफुल्ल चोरडिया, वैभव शेटीया, सनी चोरडिया, आनंद गुगळे, अनिल धोकरीया, महादेव हराळ, योगिराज काकडे, सिद्धार्थ बंब, बलभीम मोढवे, बद्रीनाथ बेरड आणि संतोष डुंगरवाल व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
    यावेळी पुढे बोलताना रोहित मानधनी यांनी एस आर जे स्टील हा ग्राहकांच्या प्रसिद्धी मध्ये उतरलेला तसेच सर्वोत्तम दर्जा असलेला स्टीलचा ब्रॅण्ड असून पूर्ण भारतात यास मागणी असल्याचे नमूद केले. याचे उत्पादन जालना येथे केले जात असून तेथे या कंपनीच्या चार फॅक्टरी आहेत. मागील ५० पेक्षा जास्त वर्षा पासून श्री ओम स्टील अश्या नावाने असलेल्या या स्टील चे आता एस आर जे स्टील असे नामांतर झाले असून एस आर जे स्टील हा अतिशय नावाजलेला ब्रॅण्ड असून अहमदनगर मध्ये त्यांचे तेरा डीलर आहेत. अहमदनगरच्या शहराच्या सर्व भागामध्ये हे स्टील आपणास उपलब्ध असून ग्राहक सेवेस आम्ही प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.
    एसा अध्यक्ष अन्वर शेख म्हणाले की, एस आर जे स्टील आणि आमच्या संस्थेचे खूप जुने ऋणानुबंध असून स्टीलचा उत्तम दर्जा आणि ग्राहक सेवेस एस आर जे स्टील नेहमीच प्राध्यान्य देत असून त्यांची टेक्निकल टीम आमच्या अडचणीचे नेहमीच समाधान करत असल्याचे नमूद करून या स्टील कंपनीच्या पुढील भवितव्यास संस्थेतर्फे शुभेच्छा दिल्या. तसेच श्री ओम पासुन एस आर जे स्टील या कंपनीचा नवीन नामकरण कार्यक्रम घेण्यासाठी अहमदनगर आणि एसाची निवड केल्याबद्दल आभार मानले.
   या कार्यक्रमाचे नियोजन एस आर जे स्टीलचे रिजनल मॅनेजर अनिरुद्ध पांडे, एरिया सेल्स मॅनेजर अविनाश पुरोहित तसेच ब्रॅण्ड प्रमोशन अधिकारी विशाल येसेकर यांनी केले होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा