मख़दुम समाचार
पुणे (प्रतिनिधी) २३.६.२०२३
येथील स्टारविन्स गृप यांच्यावतीने सुरू असलेल्या ६ व्या पॅलेट आर्ट प्रदर्शनाचे काल दि.२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहूल बळवंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी तृप्ती देधिया, रोहित नाथ, प्रमुख पाहुण्या अनु रघुनाथन, सिमा खान, पायल खोत, शाक्या रामटेके, मानस जोशी आदी उपस्थित होत्या.
बालगंधर्व कलादालनात सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष असून दि. २२ ते २४ जून सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
प्रदर्शनासाठी भारती विद्यापीठ कन्या प्रशालेच्या शाक्या मधुकर रामटेके या इयत्ता ९ वी तील विद्यार्थीनीच्या ५ चित्रांची निवड झाली आहे. तिला कलाशिक्षका श्रध्दा कुमठेकर, वर्गशिक्षक वाघमोडे सर आणि मुख्याध्यापिका अलका लाड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असते.
प्रदर्शनात अनेक महत्वाच्या चित्रकारांनी चितारलेले चित्र रसिकांसाठी पहाण्यास उपलब्ध आहेत. पुणे व परिसरातील अनेक कलाकार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
कोणाचेही प्रायोजकत्व न घेता स्टारविंग्ज गृप सदस्य स्वबळावर २०१८ पासून गेली ५ वर्ष हे प्रदर्शन भरवित असल्याचे सांगितले.
कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन चित्रकार शाक्या यांच्यासह स्टारविन्सगृपचे प्रणव तावरे, राज लोखंडे, प्रथमेश खर्गे, स्नेहा बुधकर, सुवर्णा चव्हाण, स्वरदा देवधर, प्रमेय झोरे यांनी केले आहे. स्टारविन्स गृपच्या अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट देणे - www.starwinsgroup.com
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : Beauty with Brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कलावार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
मटा.ची बातमी वाचा : रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचंय, आता द्यावी लागणार परीक्षा, रेराचा नवा नियम जाणून घ्या
हे हि वाचा : 'सोने' व 'चांदी' बाजारभाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा