बालकामगार कायद्याचे पालन होण्यासाठी दुकाने, आस्थापना, कारखाने, सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल व गॅरेजमधे १४ वर्षाखालील बालकांना व १४ ते १८ किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेऊ नये - नि.कृ. कवले; १२ जुन बालकामगार विरोधी दिनानिमित्त आवाहन !


▫️मख़दुम समाचार▫️ 
अहमदनगर (प्रतिनिधी) ९.६.२०२३
    महाराष्ट्र राज्यामधे १२ जुन हा जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो अहमदनगर जिल्ह्यातील व्यावसायिक, कारखानदार, दुकाने मालक, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता सहा. कामगार आयुक्त नि.कृ.कवले यांनी आवाहन केले आहे की, हॉटेल व गॅरेजमधे १४ वर्षाखालील बालकांना व १४ ते १८ किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेऊ नये.
    ते पुढे म्हणले की, बालकामगार कायद्याचे पालन होण्यासाठी दुकाने, आस्थापना, कारखाने, सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल व गॅरेज या ठिकाणी १४ वर्षाखालील बालकांना व १४ ते १८ किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेऊ नये. अशी मुले कामावर ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अंतर्गत जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून १२ जून हा दिवस साजरा केला जाणार आहे. १४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियामध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार रूपये व कमाल ५० हजार रूपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्ष पर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
      बालकास किंवा किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचा इमेलवर  acl.nagar1@gmail.com या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नितीन कवले सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा