४०० पेक्षाजास्त विद्यार्थ्यांची दिंडी पाहून थबकली प्रभादेवी; बालविकास मंदिर शाळेचा सांस्कृतिक उपक्रम !


मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)  ३०.६.२०२३
    आषाढी एकादशी निमित्त बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा प्रभादेवी यांनी दिंडीचे आयोजन केले होते. दिंडीत मुख्याध्यापक नरेंद्र शिर्के, सर्व शिक्षक तसेच प्राथमिक व माध्यमिकचे जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी व शंभरहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेतून पालखी घेऊन बाणेश्वर वरळी बस डेपो येथे असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी नेण्यात आली.
    पारंपरिक वाद्य वाजवणारे आणि लेझीमच्या तालावर नाचणारे विद्यार्थी यामुळे पालखीला उत्सवाचे स्वरूप आले. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा व वारीचे महत्व कळावे यासाठी शाळा दरवर्षी असा प्रयत्न करते. आज मराठी शाळांचे अस्तित्व कमी होत असताना या शाळेने केलेला प्रयत्न खरोखरच वाखाण्याजोगा आहे.
     आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापक नरेंद्र शिर्के यांच्या हस्ते पालखी पूजन करून सोहळ्यास सुरुवात झाली. बाणेश्वर वरळी बस डेपो येथे असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी नेण्यात आली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन भक्तीगीत व अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले. संतवाणी व अभंग ऐकण्यासाठी प्रभादेवीतील नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. मुख्याध्यापक तसेच शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थांच्या दिंडीमुळे संस्कृती व संस्कार पुढच्या पिढीकडे पोहचवण्यात शाळेला यश मिळत असल्याबद्दल उपस्थितांसह परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा