पत्रकार बंडू पवार यांच्या ’अस्वस्थ मनाच्या व्यथा’ संग्रहाचे १ जुलै रोजी प्रकाशन; महेश मांजरेकर, जेष्ठ पत्रकार अंशुमन तिवारी, पद्मश्री पोपट पवार यांच्या उपस्थितीत होणार सोहळा !


मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी)  ३०.६.२०२३
    पत्रकार बंडू पवार यांच्या ’अस्वस्थ मनाच्या व्यथा’ या कथासंग्रहाचे उद्या शनिवारी १ जुलै रोजी सायं. ६:३० ते ८:३० वेळेत अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, गुलमोहोर रोड येथे प्रकाशन होणार आहे.

     कोरोना कालावधीत जगलेल्या सर्वसामान्य माणसांचा प्रवास या अस्वस्थ मनाच्या व्यथा’ कथासंग्रहातून बंडू पवार यांनी मांडला आहे. कथासंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपट पवार असणार आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर, वरिष्ठ पत्रकार अंशुमन तिवारी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे यांच्या हस्ते या कथासंग्रहाचे प्रकाशन होणार असून, प्रकाशन सोहळ्यासाठी सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे उपस्थित राहणार आहेत.

    या कथासंग्रहाचे पुणे येथील प्रकाशन वल्लरी प्रकाशन यांनी केले आहे. प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार पवार यांनी केले आहे.


Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा