मख़दूम समाचार
परभणी (प्रतिनिधी) २५.८.२०२३
येथील कामगार व महिला चळवळीत सातत्याने अग्रेसर असणाऱ्या कॉम्रेड ॲड. माधुरी क्षीरसागर या आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाच्या दक्षिण आशियायी देशातील कामगार प्रतिनिधींच्या परिषदेत सहभागी होत आहेत. ता. २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत नेपाळमधील काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाच्या वतीने दक्षिण आशियायी देशांच्या कामगार प्रतिनिधींची विशेष परिषद संपन्न होत आहे. या परिषदेत महिला कामगारांच्या समस्यांबाबत आणि रोजगारनिर्मिती क्षेत्रामधील महिलांचा सहभाग आणि समानता या विषयावर ही परिषद होत आहे.
कॉम्रेड माधुरी क्षीरसागर या आयटक कामगार संघटनेच्या माध्यमातून सक्रीय असून अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या त्या महाराष्ट्र सचिव आहेत. त्याचबरोबर आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या राष्ट्रीय कौन्सिलवर त्यांची निवड झाली आहे. साक्षरता अभियानापासून सुरुवात करून त्यांनी विविधस्तरावरील कामगार संघटना व महिला आंदोलनात कार्य केले आहे.
आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाच्या या परिषदेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, जपान आदी देशातील विविध कामगार संघटना प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
Post a Comment