मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १६.८.२०२३
सध्या सुरू असलेल्या पदभरतीसाठी अनेक विद्यार्थ्यांना लांब अंतरावर परीक्षा केंद्र भेटलेले आहेत.तलाठी भरती परीक्षेसाठी जादा शुल्कानंतर आता विद्यार्थ्यांवर प्रवास भाडे आणि राहण्याच्या खर्चाचा बोजा पडला आहे. आधीच बेरोजगारी त्यात हा वाढीव खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न अनेक गरीब विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.टीसीएस कंपनीमार्फत घेण्यात
येणाऱ्या तलाठी भरती केंद्रासाठी विद्यार्थ्यांना तीन जिल्ह्यांचे पसंतीक्रम पर्याय द्यायचे होते. या तीनपैकी एकाच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते स्वत: राहत असलेला जिल्हा पहिला पसंतीक्रम तर आजूबाजूचे जिल्हे दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम म्हणून निवडला जातो काही विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यासह ज्या जिल्ह्यात नातेवाईक आहेत ते जिल्हे परीक्षा केंद्रासाठी पर्याय म्हणून निवडले होते.तीन पर्यायांपैकी काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्र न देता वेगळ्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ३०० ते ४०० किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यासाठी एक दिवस आधी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन राहावे लागणार असल्याने तिथे राहण्याच्या खर्चाचा बोजा विद्यार्थ्यांवर पडणार आहे.
राज्य सरकारने दीर्घकाळानंतर ४,६४४ तलाठी पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये,तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यावर विद्यार्थ्यांनी नाराजी आहेच त्यात आता दूरचे परीक्षा केंद्र आल्याने विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणीत भरच पडली आहे. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही
परीक्षा होणार आहे.तरी आपणास विनंती आहे की, प्रवेश पत्र दाखवून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास देण्यात यावा.
डॉ.संतोष साळवे
शहर सचिव, महाराष्ट्र नवनिर्मण सेना, अहमदनगर
Post a Comment