मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २४.८.२०२३
येथील आम आदमी पार्टीच्या वतीने चंद्रयान-३ मोहिम यशस्वी केल्याबद्दल इस्रोमधील शास्त्रज्ञांचे पेढे वाटून अभिनंदन केले तसेच मोठा आनंदोत्सव साजरा केला. चंद्रावर चंद्रयान-३ हे सुरक्षितरित्या उतरवल्याबद्दल आम आदमी पार्टीने अहमदनगर शहरातील प्रेमदान चौकात सर्वत्र मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. चौकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पार्टीच्यावतीने पेढे वाटप केले.
या आनंदोत्सवात विद्याताई शिंदे, अशोक डोंगरे, दिलीप घुले, गणेश मारवाडे, प्रकाश फराटे, नितीन लोखंडे, सीताराम खाकाळ, पोपट बोरसे, तुकाराम भिंगारदिवे, गणेश शिंदे, राहुल तांबोळी आदींसर अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
إرسال تعليق