अल्लामा इक्बाल सोसायटीतर्फे मेरी मट्टी मेरा देश अभियानांतर्गत वृक्षारोपण

जळगाव :   इक्बाल कॉलनी, मेहरूनची युवा संघटना डॉ.इक्बाल स्पोर्ट्स सोसायटी तर्फे अनेक कल्याणकारी व सामाजिक सेवा पुरविण्यात  येते. यांतूनच एक कार्यक्रम म्हणजे आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी 10 ठिकाणी ट्री गार्ड सोबत मोठी रोपे लावण्यात आली.स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवाच्या  "मेरी मिट्टी मेरा देश" या विशेष मोहिमेअंतर्गत डॉ.इक्बाल कॉलनीच्या आवारात तरुणांनी लावलेली ही रोपे ताजी हवा, ऑक्सिजन आणि प्रसन्न वातावरणासाठी हातभार लावतील. यावेळी डॉ.इक्बाल स्पोर्ट्स सोसायटीचे अध्यक्ष साबीर शेख, संघटनेचे मार्गदर्शक फरीद शेख सर, शकील खान सर, अली पठाण, आसिफ हारून सर, डॉ.शोएब शेख, शाह अब्दुल रज्जाक, अयुब शेख, इसहाक शेख, जुबेर देशमुख आदी उपस्थित होते.वृक्षारोपण करताना इक्बाल स्पोर्ट्सचे अधिकारी परिसरातील आबालवृद्ध

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा