सात दशकांहून अधिक काळ मराठी साहित्य रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गंगाधर गाडगीळ यांची पुस्तके वाचा


मख़दूम समाचार 
२५.८.२०२३
      गंगाधर गाडगीळ जन्मशताब्दी वर्ष सांगता. मराठी नवकथेचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ यांचा आज १०० वा जन्मदिन. मराठी साहित्याला एक नवीन आयाम देणाऱ्या थोर साहित्यिकाला विनम्र अभिवादन. विशेष बाब म्हणजे 'कबुतरे' हे पॉप्युलर प्रकाशनाचे पहिले मराठी पुस्तक गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले आहे. पॉप्युलर प्रकाशनाला देखील यावर्षी १०० वर्ष पूर्ण होत करत आहे. या साऱ्या वाटचालीत गाडगीळांच्या उत्तमोत्तम कादंबऱ्या, कथासंग्रह पॉप्युलर प्रसिद्ध करू शकले, हा एक बहुमान आहे. गंगाधर गाडगीळांची पुस्तके खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर Click करा. https://shorturl.at/kL369
      गाडगीळांची २५ हून अधिक पुस्तके पॉप्युलरने प्रकाशित केली आहेत. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावर आधारित 'दुर्दम्य'ही कादंबरी, 'आरंभ' ही महानगरी मुंबईच्या पायाभरणीचा रंजक प्रवास माडणारी कादंबरी, 'लिलिचे फूल'ही लैंगिक मनोवृत्तींचा वास्तव संघर्ष चित्रित करणारी त्याकाळाच्या पुढे जाणारी कादंबरी हे त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत मैलैचे दगड आहेत.एका मुंगीचे महाभारत’ हे गाडगीळांचे आत्मचरित्र,ज्याला साहित्य अकादमी सन्मान प्राप्त झाला. ‘खडक आणि पाणी’हा समीक्षा ग्रंथ, आठवण, ओलं उन्ह, वेगळं जग, तलावातलं चांदणं, खाली उतरलेलं आकाश, सोनेरी कवडसे, कबुतरे, गुणाकार, Husbands And Pumpkins and other Stories हे कथासंग्रह हे सारे गाडगीळांचे साहित्य वैभव पॉप्युलरने प्रकाशित केले आहे. यापैकी काही पुस्तकांच्या नवीन आवृत्या पॉप्युलरकडून येत्या वर्षांत प्रसिद्ध होणार आहे. 
    कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, ललित लेखन यांमधुन रसिकांना एका अद्भुत जगाचे दर्शन घडवणाऱ्या गाडगीळांचे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने बहुआयामी होते. साहित्यिक समाजाभिमुख कसा असावा याचे  मूर्तिंमंत उदाहरण म्हणजे गंगाधर गाडगीळ. म्हणूनच साहित्यिकाचा पिंड जपताना त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ देखील लिखिता राहिला. २५ वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहीलेल्या गाडगीळांनी आर्थिक प्रश्न व अर्थरचना (१९५३), नियोजन आणि समृद्धी (१९६१) ही त्यांची काही अर्थशास्त्रविषयक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष (१९८४-२००७) म्हणून त्यांनी केलेले पायाभूत स्वरूपाचे कार्य त्यांच्या साहित्येतर संस्थात्मक कार्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. 
      सात दशकांहून अधिक काळ मराठी साहित्य रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान साहित्यिकाला पुनश्च विनम्र अभिवादन. गंगाधर गाडगीळांची पुस्तके खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर Click करा. https://shorturl.at/kL369 
अधिक माहितीसाठी +91 98672 42407, 022 2353 0303 या क्रमांकावर संपर्क करावा.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा