हिंदु जन आक्रोश मोर्चाच्या वेळी धार्मिक स्थळांना बंदोबस्त द्यावा व हेट स्पीच करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सकल बहुजन समाजाची मागणी

अहमदनगर - राहुरी या ठिकाणी सर्व समाज आपसात एकोप्याने व बंधुभावाने रहात आहे.परंतु शहरातील काही समाजकंटकाकडून राहुरी शहरातील एकोप्याला तसेच बंधू भावाला संपुष्टात आणण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहे.राहुरी शहरातील उंबरे या गावातील आमच्या अल्पसंख्यांक बांधवांना राजकीय शक्तीचा वापर करून जाणीवपूर्वक खोट्या गुन्हयात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे."जो खरा दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा व्हावी" परंतु निरपराध व्यक्तींना या खोट्या गुन्हयामधून मुक्त करण्यात यावे. राहुरी तालुक्यातील तसेच उंबरे
गावातील काही समाजकंटकांनी पूर्वनियोजित पद्धतीने दंगली भडकवण्याचा उद्देशाने मुस्लिम धर्मात पवित्र असलेल्या मस्जिद मध्ये घुसून तोडफोड करण्यात आली तसेच मस्जिद ची विटंबना करून जाणीवपूर्वक समस्त मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या. तरी देखील समाजात शांतता अबाधित राहावी या हेतूने मुस्लिम समाजाने शांततेची भूमिका घेतली. एवढे सर्व अनुचित प्रकार करून देखील मुख्य उद्देशाने राहुरीत दंगल भडकली नाही म्हणून या समाजकंटकांकडून दंगली घडविण्याच्या पूर्वनियोजित पद्धतीने हिंदू जनअक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू धर्मियांचे माथे भडकवण्याचे कार्य केले जाऊ शकते.तसेच त्यांना दंगली घडवण्यास प्रवृत्त करण्याचे देखील कार्य केले जाऊ शकते. या मोर्चाच्या माध्यमाने अल्पसंख्यांक समुदायाबद्दल खोटे आरोप करून अल्पसंख्यांकाचे भावना दुखण्याचे काम केले जाऊ शकते. यामध्ये भर म्हणून आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी कुप्रसिद्ध असलेले तसेच अल्पसंख्यांकावर खोटे नाते आरोप करून हिंदू धर्मीयांच्या मनात अल्पसंख्यांकाबाबत द्वेष निर्माण करणारे आमदार नितेश राणे व सुदर्शन चॅनल चे संपादक सुरेश चव्हाण के हे देखील या सभेचे नेतृत्व करू शकतात. होणाऱ्या अनुचित प्रकार थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनुसार "हेट स्पीच अंतर्गत या दोन्हीही वक्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाही करण्यात यावी.या वक्तयांना परवानगी दिली असता होणाऱ्या सर्व परिणामाबाबत या दोन्हीवर,तसेच जन आक्रोश मोर्चाचे आयोजक यावर कारवाई करण्यात यावी. राहुरी तालुक्या बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना, गुन्हेगारांना सदर जन आक्रोश मोर्चात येण्यापासून मज्जाव करण्यात यावा. शहरातील सेन्सिटिव्ह एरिया मधून त्यांना मोर्चा नेण्यात परवानगी देण्यात येऊ नये. त्या ठिकाणी पुरेसा फौज फाटा तैनात करण्यात यावा.अशी मागणी 
राहुरी शहरातील बहुजन शांतता प्रिय नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली आहे.
यावेळी इमरान देशमुख,अॅड मुजाहीद खान, अब्दुल आतार, मुसद्दीक पठाण, आदित्य साळवे, इमरान सय्यद, रमेश खंडागळे, अकरम काकर, सिकंदर काकर, तौफिक शेख, शाहरुख शेख, सोहेल हाजी खान, अनिल जाधव, सय्यद खालील, रियाज शेख, इकबाल शहा, निसार बागवान आदि उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा