मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २.८.२०२३
महाराष्ट्रात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे भडकाऊ भाषण करीत असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एक सनातन संभाजी भिडे महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये निर्माण होईल असे भडकाऊ भाषणे करीत आहे. राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि राज्यघटनेबद्दल देशद्रोही वक्तव्य करीत आहे. काही दिवसांपूर्वी भिडे या इसमाने महात्मा गांधीबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केले. संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांसारख्या महापुरुषांची बदनामी होईल अशी भाषणे केली परंतु त्यांच्यावर सरकारने कोणतेही कारवाई केली नाही त्यामुळे त्यांची हिम्मत वाढली. मनोहर भिडेची भाजपचे खासदार बोंडे हे समर्थन करीत आहे. भिडेला पाठिंबा देणारे त्यांचे समर्थन करणारे त्यांच्या मागील मास्टरमाईन शोधून भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोहर भिडेचा निषेध करण्यात आला.
यावेळी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा सचिव ॲड. कॉ. बन्सी सातपुते, भारती न्यायपेल्ली, सगुना श्रीमल, संगीता कोंडा, अरुण थिटे, दीपक शिरसाट, शिवाजी साळवे, बाळकृष्ण जगताप, जयवंत बोरुडे, संजय मोडवे, जयवंत बोरुडे, शिवम यादव, संजय मोढवे, विनोद वारे आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
إرسال تعليق