प्राण्यांचा वापर बंद करा", "प्राण्यांनाही स्वातंत्र्य हवे " या मागणीसाठी उपोषण सुरू

अहमदनगर - १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. दरवर्षी आपण स्वातंत्र्याचे गोडवे गातो व स्वातंत्र्याचा काय अर्थ आहे किंवा फायदे काय आहेत त्याचे वर्णन ऐकतो, अनुभवतो. परंतु या पृथ्वीतलावरील मनुष्य प्राणी सोडून सर्व प्राणी भयभीत आहेत. त्यांचे जीवन माणसाने अत्यंत दयनीय केले आहे, प्राण्यांना मारुन खाणे, त्यांचेकडून कामे करून घेणे, प्राण्यांच्या शर्यती व झुंजी लावणे, त्यांचेपासून औषधे बनविणे, प्राण्यांना बांधून ठेवणे, त्यांचा वाट्टेल तसा वापर करणे असे अनेक प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर
केले जातात.
प्राणीमित्रांनी या अत्याचारांविरुध्द चळवळ सुरु केली आहे. त्याकरीता "प्राण्यांचा वापर बंद करा" या मागणीसाठी व प्राण्यांनाही स्वातंत्र्य हवे यासाठी पोलीस मुख्यालया समोर, न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज समोर  एक दिवसाचे उपोषण केले. 
प्राणीमित्रांना पाठिंबा देण्यासाठी व त्याचे विचार जाणून घेण्यासाठी लोकांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी व आम्हा प्राणीमित्रांच्या व्यथा जाणून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अनिल कटारीया,दर्शना मुजुमदार, आकाश जाधव, सिध्दांत वाघचौरे, दत्तात्रय खैरे ,अतुल पाखरे, शुभम कांबळे, ऋशीकेश परदेशी, मेघा भालेराव, सुयोग कटारिया,मनोज कासलीवाल, कौशल पांडे, रवींद्र कंगे,शितलकुमार कटारिया,सिराज सय्यद आदी उपोषण बसले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा