क्रांतिसिंहांचे योगदान अनन्यसाधारण त्याची जाण राजकर्त्यांना नाही. सामान्य माणसांचे नाव घेऊन भांडवलदारांसाठी राज्यकारभार करत आहेत. धर्माच्या, जातीच्या नावावर माणसांमाणसांमधे फुट पाडत आहेत - कॉ. अतुल कुमार 'अंजान'; राष्ट्रीय शेतकरी नेते कॉ. अतुल कुमार यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान


मख़दूम समाचार 
सांगली (प्रतिनिधी)  ७.८.२०२३
    गेल्या तीन महिन्यांहून आधिक काळ देशाच्या एका राज्यामधे जो हिंसाचार सुरू आहे, दंगली सुरू आहेत या गोष्टी अतिशय लांछनास्पद आहेत. मणिपूरमधील स्त्रियांच्या विवस्त्र धिंडीने देशाची अब्रु जगाच्या वेशिवर टांगली आहे. एकीकडे 'बेटी बचाव'चा नारा द्यायचा आणि त्याचवेळी राजरोसपणे स्त्रियांची विवस्त्रधींड निघत असताना, त्यांचेवर बलत्कार होत आसताना त्यावर कुठलीही कृती करायची नाही. मणिपूर पेटत आहे. त्याची चर्चा जगभर होत आहे आणि आमचे प्रधानमंत्री त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. देशाची संसद बंद पडत आहे आणि प्रधानमंत्री संसदेपासून दूर जाताहेत हे चित्र भयानक आहे. ते बदलायला पाहीजे, असे कॉ.अतुल कुमार 'अंजान' विटा येथे भाषणात म्हणाले.
क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाच्या वतीने त्यांना डॉ. भालचंद्र कानगो यांचे हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार देण्यात आला, यावेळी बोलत होते. यावेळी मंचावर ॲड. भाई सुभाष पाटील, भाई सुभाष पवार, भाई व्ही.वाय. पाटील, ॲड. सयाजी पाटील, प्रा. विलास पाटील, ॲड. नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील उपस्थित होते.
    पुढे बोलताना अतुल कुमार म्हणाले, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण गामावले आहेत. अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे. यामधे क्रांतिसिंह नाना पाटलांचे योगदान अनन्यसाधारण आहे परंतु त्याची जाण राजकर्त्यांना राहिली नाही. आजचे राज्यकर्ते सामान्य माणसांचे नाव घेऊन भांडवलदारांसाठी राज्यकारभार करत आहेत. धर्माच्या, जातीच्या नावावर माणसांमाणसांमधे फुट पाडत आहेत. हे चित्र बदलले पाहीजे.
    यावेळी प्रमुख अतिथी डॉ. कानगो म्हणाले कि, आज पंतप्रधान हुकूमशाही वृत्तीने वागत आहेत केवळ आदानी अंबानीचे भल्यासाठी देशाला वेठीस धरत आहेत. संसदेच्या परिसरात जाऊनही संसदेत जात नाहीत. असे राज्यकर्ते जनतेच्या काय उपयोगाचे. आज पुन्हा क्रांतिसिंहांच्या 'प्रतिसरकार'ची गरज निर्माण झाली आहे. 
यावेळी दमयंती पाटील यांनी क्रांतिविरांगना हौसाताई पाटील यांची शब्दबंध केलेल्या 'मी क्रांती मी संघर्ष' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 'लोकवाङ्मयगृहाने प्रसिद्ध केली आहे. त्याचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई विद्यापीठामधे मराठी विषयात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्यावर पी. एचडी. प्रबंध सादर केल्याबद्दल डॉ.प्रा. शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक ॲड. सुभाष पाटील यांनी. मानपत्राचे वाचन ॲड. नानासाहेब पाटील यांनी तर आभार विजय महींद यांनी मानले.         कार्यक्रमास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव ॲड. सुभाष लांडे, महाराष्ट्र राज्य किसानसभेचे कॉ.राजन क्षीरसागर, प्रा.बाबुराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, कॉ. नंदकुमार हत्तीकर, प्रा. विश्वनाथ गायकवाड, कवी रघुराज मेटकरी यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.



Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा