कोपरगावात मुस्लिम समाजाचे उपोषण - धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव
थडी येथे धार्मिक ग्रंथाची विटंबना
करणाऱ्या आरोपीस अटक करावी, खोटे आरोप करून धुडगूस
घालणाऱ्यांवर कारवाई करावी,
भडकावू भाषण करून धार्मिक व
जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर
कायदेशीर कारवाई व्हावी, या व इतर मागण्यांसाठी समस्त मुस्लिम
समाजाच्या वतीने मंगळवारपासून
कोपरगाव तहसील कार्यालयासमोर
उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील मशिदीत गुरुवार दि. १० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते. या घटनेचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले. असंख्य नागरिक कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात जमले. तिथे आरोपीच्या अटकेची मागणी केली होती.
घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक न
झाल्याने मंगळवार दि.२२ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर
मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उपोषणस्थळी घडलेल्या घटनेचा
निषेध करण्यात आला.तसेच समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या उपद्रवींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये फिरोज पठाण, अकबर शेख, अयाज कुरेशी, शरफुद्दीन सय्यद, अजिज शेख,
नवाज कुरेशी, अन्सार शेख, वसीम चोपदार, जावेद शेख, अमजद शेख,
इरफान शेख, तौसिफ मणियार, इम्रान शेख, फिरोज पठाण, इरफान कुरेशी, असलम शेख, नदीम अत्तार, जुनेद खाटीक, नदीम शेख आदींचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा