अहमदनगर - कोणतेही काम करत असताना त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवता सतत समाजासाठी चांगले कार्य करत राहिल्यास कोणाचेही काहीही कधी वाईट होत नाही. त्या उलट परमेश्वर आपल्याला मान सन्मानच देतो. केंद्र सरकारच्या ओबीसी आयोगाकडून मिळालेला सन्मान हा अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल असे प्रतिपादन सॉल्वेशन आर्मी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी केले.कोरोना काळात रुग्णांची मोफत सेवा दिल्याबद्दल सॉल्वेशन आर्मी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे व डॉ. ममता कांबळे यांना केंद्र सरकार च्या ओबीसी आयोगातर्फे राष्ट्रीय एकता पुरस्काराने ओबीसी वर्ग आयोगाचे चेअरमन जगदीश यादव, सचिव रणजीत सिंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचा मुस्लिम मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने शाल श्रीफळ व भेट देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अमीर सय्यद,शहेबाज हाजी साहब,मेजर सुनील साळवे, परवेज शेख, शाहनवाज तांबोली, इम्रान भाईजान आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment