अहमदनगर किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एक उत्तम रचनेचा किल्ला आहे


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) १६.८.२०२३
    २६ जानेवारी २०२३ रोजी चांदबिबी महालास भेट दिल्यानंतर भुईकोट किल्ल्याला भेट देण्याचे नियोजन होते. मात्र वाहतुकीच्या कोंडीत माझी फोर व्हीलर अडकली. पोहोचण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत किल्ला पाहण्यासाठी बंद करण्यात आला होता. त्याचवेळी किल्ला पाहण्याचा निश्चय केला. तो पूर्ण झाला काल, १५ ऑगस्ट २०२३ रोजी या किल्ल्यास भेट देण्याचा योग आला.
अहमदनगरचा हा किल्ला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एक उत्तम रचनेचा किल्ला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जवळ भिंगार नदीच्या भिंगार गावाच्या काठावर तो वसला आहे. तो हुसेन निजामशाह यांच्या संरक्षणाखाली बांधला गेला. हा किल्ला सर्व बाजूंनी छावणीने वेढलेला आहे.
अहमदनगर हे सल्तनतचे मुख्यालय होते. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसर्‍या एंग्लो-मराठा युद्धाच्या वेळी या किल्ल्यावर हल्ला केला. ब्रिटीश राजवटीत तुरुंग म्हणून याचा उपयोग केला जात असे. 
    आज, हा किल्ला लोकप्रिय आकर्षणांपैकी एक आहे. सध्या तो भारतीय लष्कराच्या आर्मर्ड कोरच्या ताब्यात आहे.
१८०३ मध्ये अहमदनगर किल्ला 
गोलाकार होता, चोवीस बुरुज, एक मोठे गेट आणि तीन लहान बंदरे होती. त्यात ग्लेकीस होता, कव्हर केलेला मार्ग नव्हता. दोन्ही बाजूंनी दगडाने खोदलेले, जवळपास १८ फूट रुंद, आणि ९ फूट  पाणीच पाणी, जे फक्त स्कार्पच्या माथ्याच्या ६ किंवा ७ फूट आत पोहोचलेले होते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा या निजामशहाने इ.स. १४९० मध्ये नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच नावावरूनच या शहराला 'अहमदनगर, असे नाव पडले.
   इ.स. १४९४ मध्ये शहराची रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. अहमदनगर जवळचा हा भुईकोट किल्ला हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. 
याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी 'हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला.
अहमदनगर शहरात राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ लिहिले.
    इ.स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला. भारतीय सैन्याने किल्ल्याचा ताबा घेतला असला तरी, गेटवर सही करून किल्ल्यात प्रवेश करण्यास परवानगी आहे. सध्या वर्षातून हा भुईकोट किल्ला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवसापुरताच सर्वांसाठी खुला करण्यात येतो. अलोट गर्दी पण कमालीची शिस्त कारण या किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि चोहोबाजूंनी मिलिटरी जवान कायमस्वरूपी तैनात असतात. पोलिसांनीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. लाखोंच्या गर्दीतून पाय निघत नव्हता. त्याचवेळी देशभक्ती पर गीत आठवले.
    "कर चले हम फ़िदा, जान-ओ-तन साथीयों, अब तुम्हारे हवाले वतन साथीयो"

सांस थमती गई, नब्ज जमती गई,
फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया

कट गये सर हमारे तो कुछ ग़म नहीं
सर हिमालय का हमने न झुकने दिया

अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...

     खरंच, बलिदान देऊन आपल्यासाठी झोकून देणाऱ्या शहीद जवानांना लाख  सलाम. हा किल्ला अनेकांनी पहिला असेल. काहींनी पहिला नसेल. आपणही हा भुईकोट किल्ला नक्की आवर्जून पहावा आणि म्हणून हे लिखाण.
पत्रकार शफीक बागवान,
श्रीरामपूर, अहमदनगर

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा