मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ११.९.२०२३
येथील भरतनाट्यम डान्स स्टुडिओच्यावतीने मंगळवारी ता. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १० यावेळेत आम्रपाली मंगल कार्यालय, गुलमोहोर रोड, अहमदनगर येथे मंगळागौर महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अंजली नृत्यालयाच्या सुरेखा डावरे, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, सूफी गायक पवन नाईक, दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, शिवशाही पुनवर्सन प्रकल्प व्यवस्थापकिय संचालक गुलाबराव खरात आदि उपस्थित राहणार आहेत. निवेदन विनय कसबेकर करणार असून, कार्यक्रमाचे आयोजन विक्रम देशमुख, सिमा देशमुख, मंगळागौरी टिमच्या मानसी देठे करत आहेत.
गेल्या महिन्याभरापासून पारंपारिक नृत्य व खेळ, मंगळागौर महिला शिबीरातील प्रशिक्षित ७० शिबीरार्थीं महिलांचा कलाविष्कार सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मानसी देठे यांनी केले आहे.
◾
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : beauti with brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कला वार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
मटा.ची बातमी वाचा : रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचंय, आता द्यावी लागणार परीक्षा, रेराचा नवा नियम जाणून घ्या
हे हि वाचा : 'सोने' व 'चांदी' बाजारभाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
إرسال تعليق