मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १२.९.२०२३
येथील चित्रकार कै. ए. जी. शेकटकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या कला विकास मंडळ संचालित रचना कला महाविद्यालयाच्या वतीने २५ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशांत शेकटकर आणि वर्षा शेकटकर यांनी दिली.
शहर व तालुक्यातील विद्यार्थी, मुख्याध्यापक व कलाध्यापक यांच्यासह चित्रकारांना आवाहन करताना म्हटले आहे की, मानवी भावनांच्या प्रकटीकरणाचे एक यथार्थ साधन म्हणजे चित्रकला असते. विद्यार्थ्यांच्या व कलारसिकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या मधील कला गुणांना विकासित करण्यासाठी या वर्षी 'कोकुयो कॅमलीन लिमीटेड' व रचना कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव अशी भव्य 'चित्रकला स्पर्धा' आयोजित केली आहे. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना सहभागी करावे, असे ते म्हणाले.
अधिक माहिती देताना शेकटकर यांनी सांगितले की, स्पर्धेची तारीख व वार रविवार १७ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी ९.०० वा. असून स्पर्धेचे ठिकाण दादा चौधरी विद्यालय, कोर्टगल्ली, अहमदनगर हे आहे. तसेच स्पर्धेचे गट व विषय पुढे दिल्याप्रमाणे आहेत.
गट १ - बालवाडी, विषय - आवडते चित्रे.
गट २ - इ. १ ली व २ री, विषय - १) पोलिस, २) फुलपाखरू, ३) माझा गणपती बाप्पा.
गट ३ - इ. ३ री व ४ थी, विषय - १) स्कुल बस, २) माझ्या स्वप्नातील बाईक / कार, ३) हर घर तिरंगा.
गट ४ - इ. ५ वी व ६ वी, १) मोबाईल गेम, २) आवडता आय.पी.एल. खेळाडु, ३) चंद्रयान- ३.
गट ५ - इ. ७ वी व ८ वी, १) पेट्रोल पंपावरील दृष्य, २) मला डॉक्टर इंजेक्शन देतात, ३) करोडपती मध्ये मी व अभिताभ बच्चन.
गट ६ - इ. ९ वी व १० वी, १) पोलीस स्टेशनमधील दृष्य, २) हॉस्पीटलमधील दृष्य, ३) परिक्षा हॉल.
गट ७ - पालक, १) सध्याच्या राजकीय घडामोडी.
स्पर्धेची वेळ : गट क्र. १ ते ३ व ७ सकाळी ९.०० ते ११.०० पर्यंत, गट क्र. ४ ते ७ दुपारी १२ ते २.
स्पर्धेचे नियम व अटी अशा आहेत. स्पर्धा 'अहमदनगर' शहरातील व तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी महाविद्यालयातर्फे फक्त कागद देण्यात येईल इतर साहित्य स्वतः आणावयाचे आहे. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेची प्रवेश फी गट क्र. १ ते गट क्र. ७ पर्यंत : रुपये १०, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश यादी व प्रवेश फी शनिवार ता. १६ सप्टेंबर २०२३ सायं. ५.०० पर्यंत महाविद्यालयात जमा करावी.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दादा चौधरी विद्यालय, कोर्ट गल्ली, अहमदनगर येथे रविवारी ता. २४ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वा. संपन्न होईल. शासकिय चित्रकला न्हणजे इलीमेंटरी, इंटरमिजीएट ड्राईंग ग्रेड परिक्षेसाठी उपयुक्त असे चित्र प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा कलाक्षेत्रातील वारसा आपल्या सिध्दहस्त चित्रकलेतून साकारणारे व आपली कलासाधनेची परंपरा निरंतर सुरू रहावी, येणाऱ्या पिढ्यांना दिशादर्शक व मार्गदर्शक ठरावी असा उदात्त विचार ठेवणारे थोर चित्रकार कै. ए. जी. शेकटकर (सर) यांनी तयार केलेल्या स्मरणचित्र, वस्तुचित्र या विषयावरील चित्रांचे चित्रप्रदर्शन रविवार ता. १७ सप्टेंबर २०२३ रोजी रचना कला महाविद्यालय, सांगळे गल्ली, अहमदनगर, येथे सकाळी १० ते दुपारी ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. विद्यालयातील सर्व कलारसिकांनी व विद्यार्थ्यांनी या चित्रप्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन प्रशांत शेकटकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रचना कला महाविद्यालय, अहमदनगर
फोन नं. 0241-2345881 मो. 8275386816, 8999030080, 9028832586, 8412931870 या क्रमांकावर संपर्क साधावा.
إرسال تعليق