मख़दूम समाचार
मुंबई (प्रतिनिधी) १२.९.२०२३
मतदानाकडे लोकशाहीतील उत्सव म्हणून पहिले पाहिजे. 'अगोदर मतदान, नंतर बाकीचे काम' हे तत्व लोकशाहीत सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे. बहुमाध्यमांच्या मदतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून राज्याने मतदार जनजागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
किशोरवयीन मुले व युवकांमध्ये मतदार जनजागृती करुन लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 'मी द सुपर हिरो भारताचा नागरिक' या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
إرسال تعليق