शब्दगंध'ची अखंडपणे वाटचाल अभिमानास्पद : डॉ. मिलिंद कसबे


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) १२.९.२०२३
    सातत्याने बरीच वर्षे एखादी साहित्य चळवळ चालवणे आणि ती टिकवून ठेवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. अशा परिस्थितीत गेली वीस वर्षे शब्दगंध साहित्यिक चळवळ अखंडपणे सुरू आहे.ही अभिमानाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन मराठीचे अभ्यासक, साहित्यिक प्रा.डॉ. मिलिंद कसबे यांनी केले.शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ता. ७ व ८ ऑक्टोबर रोजी स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी वॉरियर्स एज्युकेशन सेंटर मध्ये आयोजित सूत्रसंचालकांच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
     सप्तरंग'चे अध्यक्ष डॉ.श्याम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, प्रा.पॉल भिंगारदिवे, प्रा.डॉ. दिलीप गायकवाड, राजेंद्र पवार, कवी मारूती सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.कसबे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला अनेक संवेदनशील लेखक कवी साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि कलावंतांची मोठी परंपरा आहे. या सर्वांना सोबत घेऊन शब्दगंध ची वाटचाल सुरू आहे, लेखक, कवी, साहित्यिक आपल्या लेखनाच्या दृष्टीने अधिक प्रगल्भ व व्यापक होण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले पाहिजे. सध्याच्या काळात आपली वैचारिक उंची वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लेखक विचारवंत, कलावंत आणि कार्यकर्ते हे आता लोकशाहीचे चार महत्वाचे खांब आहेत.हे खांब अधिक मजबूत करुन लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी शब्दगंध'ने पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
    भगवान राऊत यांनी पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालनाविषयी मार्गदर्शन केले. सुनील गोसावी यांनी संमेलना मागची भूमिका विशद केली. शब्दगंध च्या वतीने प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांचा शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बबनराव गिरी यांनी सूत्रसंचालन तर सरोज आल्हाट यांनी आभार मानले.
     कार्यशाळेस सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, शर्मिला रणधीर, संगीता गिरी, विश्वास गायकवाड, दशरथ शिंदे, हर्षली गिरी, प्रा.डॉ. संजय दवंगे यांच्यासह शब्दगंधचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा