मुस्लिम समाजाच्या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पांठीबा

अहमदनगर - सोमवार दि ११-९-२०२३ रोजी अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.याआंदोलनात अहमदनगर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सय्यद अफजलभाई यांनी प्रस्ताविक केले. सकल मुस्लिम समाजास मुस्लिम सरंक्षण कायदा बनवणे या करिता हे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात विशेषत: अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाजा विरूद्ध सामाजिक द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करून भडकावू भाषणे करुन जातीय तेढ निर्माण केले जात आहे. तसेच धार्मिक स्थळे, दर्गाह यांची तोडफोड करुन धार्मिक ग्रथांची विटबंना केली जात आहे. त्यातच प्रशासन मुस्लिम समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून एकतर्फी कारवाई केरत आहे.या कारणाने संविधान व न्यायालयाचा अवमान केला जात आहे हे त्वरित रोखण्यात यावे व मुस्लिम सरंक्षण कायदा लागू करावा. या करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव, जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, प्रवक्ते डॉ जालिंदर घिगे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,अनिल पाडळे, नगरसेवक भाशेठ कुरैशी,महेश साळवे,कुमार भिंगारे,प्रसाद भिवसने, ॲड. योगेश गुंजाळ व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा