मुस्लिम समाज हा सांस्कृतिक वारसा हक्क पूर्णपणे गमावत चाललेला आहे आणि हा एक संशोधनाचा विषय ठरेल असा म्हणणं वावगं ठरणार नाही,तुम्ही असंच मालमत्तेचे नुकसान करुन घ्या...! संविधानात्मक मार्गाने लढा देऊ नका? स्वतःच संघटन काय उभा करू नका?
स्वतःचे अद्यावत शैक्षणिक संस्था उभी करू नका? बस पाणी,सरबत, चादरी वाटा यातच धन्य माना...! यापलिकडे काही करू ही नका!धन्य आहे रे बाबांनो...!आज इकबाल आहे उद्या अब्दुल मग सल्या वगैरे वगैरे....! मुस्लिम समाजाचं भविष्य अंधकारमय आहे हे एक भयाण वास्तव आहे ज्याला कोणी नकार देऊ शकत नाही..
ज्यांनी कोणी सामाजिक स्वास्थ्य बिघडवले आहे त्यांना कठोर शासन होणे या मताचा मी आहे आणि असेन त्याचबरोबर ज्यांनी कायदा हातात घेऊन कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडावला त्यांना ही शासन तात्काळ होणं गरजेचं आहे..चार एक माथे फिरू मुळे समाज आणि शहरातील गोरगरीब जनतेला वेठीस धरणे हे केव्हाही अयोग्यच!
तसा मुस्लिम समाज राजकीय दृष्ट्या तर अनाथ आहेच यात वादच नाही, त्यात भर राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वता नसणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ज्यांना लाजा ही वाटत नाहीत काहीही वाचाळ बडबड करायची वाहव्वा मिळवायची कदाचित यासाठी हा महाभागांचा जन्म झालेला दिसतो अशी असणारी परिस्थिती आहे,लाज नाही आहे लाज ...म्हणतात "ना जनाची नाही तर मनाची तरी लाज असावी"! असो....! पण शेवटी समाजाचं न भरून निघणारी पोकळी नुकसान त्याच काय? अखेरीस प्रश्न असा आहे की येणारी पिढी माफ करेल का? काय देशात अल्पसंख्याक वरील हल्ल्यावर चर्चा किंवा त्यांच्या संरक्षणासाठी कायदा होईल? ही अपेक्षा करणे या पलीकडे काही मार्ग दिसत नाही.
जड अंतःकरणाने लिहावे लागते की माणूस जातीत इतका गुरफटलेला आहे त्याला माणुसकीचा विसर पडला आहे..!
अखेरीस कोण कोण्या जातीचा मला माहित नाही, पण ज्यांनी नाहक जीव गमावला त्या शहिदांना एक भारतीय म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली...!
वैचारिक बैठकीतील व्यक्तिमत्त्वांनी आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवावा ही विशेष विनंती..!
चापलूसी हुजरेगिरी आणि ज्यांना राजकीय हवा सुद्धा लागली नाही त्यांनी कृपया या पोस्ट वर अकलेचे तारे तोडू नये!
✍️......
या देशाचा एक मालक
▪️शाहिद सर, कोल्हापूर.
Post a Comment