मख़दूम समाचार
अहमदनगर (हेमंत ढाकेफळकर) २४.९.२०२३
सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुकृपा हौसिंग सोसायटी, भिस्तबाग रोड येथे मंचच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी मंचचे अध्यक्ष आदिनाथ जोशी, शरद कुलकर्णी, पी.एन.डफळ, सुरेश कुलकर्णी, ज्योती केसकर, स्नेहल वेलणकर, पुष्पा चितांबर, मोरेश्वर मुळे, माधवी कुलकर्णी, बलभीम पांडव, सर्वोत्तम क्षीरसागर, बाजीराव जाधव व शोभा ढेपे आदि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष आदिनाथ जोशी म्हणाले, ज्येष्ठ नागरिक मंचच्या माध्यमातून सभासदांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सर्व सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे सर्वच उपक्रम उत्तमरित्य यशस्वी होत आहे. ज्येष्ठांचे आरोग्य, मनोरंजन, धार्मिक, व्याख्याने आदिंतून जीवनाची संध्याकाळ सुखात घालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभासदांच्या सूचनांची अंमलबजावणी करुन सर्वानुमते निर्णय होत असल्याने आपला संघाचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. पुढील काळातही सभासदांच्या हितांचे निर्णय घेऊन चांगले उपक्रम राबवू, असे सांगितले.
यावेळी शोभाताई ढेपे यांनी मंचच्या उपक्रमातून ज्येष्ठांना आनंद देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
यावेळी देवज्ञा झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन तसेच नोटीस वाचन मोरेश्वर मुळे यांनी केले. कार्यवाह शरद कुलकर्णी यांनी मागिल वर्षाचा सभेचे इतिवृत्त वाचन केले; त्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सन २०२२ ते २४ या वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाचे वाचन कोषाध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी केले त्यास एकमताने सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांची कार्यवाह शरद कुलकर्णी तसेच मंचचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी ७५ वर्ष पुर्ण केलेल्या सभासदांचा मंचतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सभासदांनी मंचास स्वच्छेनी देणगी दिल्या. यावेळी कार्यशिल पदाधिकारी शरद कुलकर्णी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बाजीराव जाधव यांनी कविता वाचन करुन सर्वांचे आभार मानले.
إرسال تعليق