“ आता बुड नाही हलवलं तर अमक्या दिवसात भारत इस्लामिक राष्ट्र होईल,
त्यांची लोकसंख्या एवढी वाढेल त्यांच्यात चार बायका केल्या जातात आणि साताठ पोर काढली जातात “
असल्या सनाळ्या एकूण भेदरून जाणारी लोक आहेत.
वास्तव काय आहे ?
भारताच्या झालेल्या जनगणना आणि राष्ट्रीय कुटुंबकल्याण आणि आरोग्य सर्व्हे, ज्या दोन्ही गोष्टी सरकार करत.
सरकारच्या आकडेवारीच्या आधारे या भंपकपणाचा बुरखा फाडलेला आहे श्री. एस.वाय.कुरेशी , माजी निवडणूक आयुक्त, भारत सरकार यांनी.त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ‘ पॉप्युलेशन मिथ ‘ .
१९५१ साली हिंदू आणि मुस्लिमांच्या अपत्यसंख्येत असलेला फरक होता १.१ म्हणजे एका मुस्लीम कुटुंबात चार अपत्य असतील तर हिंदू कुटुंबात तीन अपत्य आहेत.
२०११ साली हाच अपत्यसंख्येचा फरक ०.४८ वर आलेला आहे. याचा अर्थ मुस्लिमांचा जननदर कमी झालेला आहे.
१९५१ साली एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची टक्केवारी होती ९.८ टक्के.
२०११ साली एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची टक्केवारी आहे १४.२ टक्के.
म्हणजे वाढ किती झाली ? ४.४ टक्के.
४.४ टक्के वाढ किती वर्षात ६० वर्षात.
म्हणजे एका वर्षात किती वाढ ?
०.०७३ टक्के वाढ.
आता हे भेदर पान लागलेल्या लोकांसाठी.
जर १९५१ साली मुस्लिमांची लोकसंख्या ९.८ टक्के होती
जर त्यानंतर साठ वर्षात मुस्लिमांचा जननदर कमी झालेला आहे.
जन्मदर कमी झालेला आहे याबद्दल ' प्यु रिसर्च सेंटर ' ने केलेला अभ्यास आणि त्याचा अहवाल यांची बातमी सोबत कॉमेंटमध्ये दिलेली आहे.
जर मुस्लिमांची लोकसंख्या ६० वर्षात ४.४ टक्के वाढत असेल,
तर
१९५१ च्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या फक्त दुप्पट होण्यासाठी ०.०७३ टक्के वाढीच्या हिशोबाने ७४ वर्षे लागतील.
आणि हा वाढीचा दर कितीही वाढवला तरी ०.१ टक्के झाला तरी हिंदुच्या संख्येच्या एवढी म्हणजेच ४० टक्के लोकसंख्या होण्यासाठी किती वर्षे लागतील याचा अंदाज आणि अंकगणित तुम्हीच मांडा.
बर मुस्लिमांची जनसंख्या वाढत असताना हिंदू बांधव नळाला बोळा लावून बसणार आहेत का ? हिंदूंचा जन्मदर या काळात शून्य होणार आहे ?
म्हणजे अगदी वीस टक्के लोकसंख्या होण्याचा विचार जरी कुणी करणार असेल तरी त्याला अजून शंभर वर्षे लागतील आणि हिंदुच्या संख्येपेक्षा जास्त लोकसंख्या होण्याचा तर विचारच नको.
मग हि भीती कशासाठी घातली जाते ?
कारण ,
जे भीती घालतात त्यांना दुसर काहीच येत नाही.
ज्यांच्याकडे देण्यासाठी भीती, द्वेष आणि हिंसा यापेक्षा वेगळ काहीही नाही,
ज्यांच्याकडे सकारात्मक काही करण्याची अक्कल, लायकी आणि कुवत काहीही नाही.
त्यांच्याकडे लोकांना भीती दाखवून , बागुलबुवा दाखवून सत्ता मिळवणे,
त्यांच्याकडे लोकांना एकमेकांच्या विरोधात झुंजवत ठेवणे आणि आपली राजकीय पोळी भाजणे यापलीकडे काहीही नाही.
आणि हा हलकटपणा करणारे दोन्हीकडे आहेत, कट्टरपंथी राजकारणाचा पायाच दुसऱ्यांची भीती आणि नकारात्मक मांडणी असते.
*आनंद* *शितोळे*
#रविवारची_पोस्ट
#मुस्लिमांचा_बागुलबुवा
إرسال تعليق