शिक्षकाला चूक क्षम्य नाही...स्नेहालयातील पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद खेर यांचे प्रतिपादन

अहमदनगर - उद्योजक, डाॅक्टर, वकील अशा अन्य कुठल्याही समाजघटकांनी चूक केली, तर एखाद्या व्यक्तीचं नुकसान होतं, परंतु शिक्षकानं चूक केली, तर संपूर्ण पिढीचं नुकसान होतं. सगळ्या समाजाचं लक्ष असल्याने शिक्षकाला चूक क्षम्य नसते, असं प्रतिपादन राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अध्यापक मकरंद खेर यांनी मंगळवारी केलं.जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये समावेश झालेल्या स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षक दिनी विविध पुरस्कारांचं वितरण करताना श्री. खेर बोलत होते. स्नेहालयाचे विश्वस्त पालक किरीटी मोरे यांच्या मातु:श्री इंदिरा शामकांत मोरे यांच्या निवृत्तीवेतनातील ठेवीतून
 स्व. शोभाताई महादेव कुलकर्णी यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेतील वैभव भगवान वाघ, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमधील शबाना ताज शेख व बालभवनचे शिक्षण समन्वयक विक्रम सुधाकर भगत यांना प्रदान करण्यात आला. स्व. प्रा. गोपालभाई गुजर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श कर्मचारी पुरस्कार स्नेहालयातील वरिष्ठ लेखापाल समाधान तुकाराम भाले यांना देण्यात आला.
 निवड समितीचे सदस्य व स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, संचालक हनिफ शेख, बालभवनचे मानद संचालक संजय बंदिष्ठी, मुख्याध्यापिका क्षितिजा हडप आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. खेर म्हणाले, समाजाकडून आपल्याला खूप काही मिळत असतं. समाजाचा मी उतराई आहे, या भावनेतून विशिष्ट वयानंतर आपण देणार्‍याची भूमिका निभवायला हवी. सकारात्मक विचारांची माणसं तयार करणं ही शिक्षकांनी आपली जबाबदारी समजावी.
पुरस्कार्थी, तसंच स्नेहालयाच्या शाळेतील शिक्षिका यास्मिन शेख आणि विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. आभार श्री. बंदिष्ठी यांनी मानले. सूत्रसंचालन तेजल थोरवे, रोशनी कनोजिया आणि शिक्षिका वीणा मुंगी यांनी केलं. सांस्कृतिक कार्यक्रमातील नृत्य आणि शिक्षकांचा रॅम्प वाॅक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
शिक्षक सर्वोच्च स्थानी..

आदर्श शिक्षक वैभव वाघ म्हणाले, समाजात सर्वोच्च स्थानी असलेल्या शिक्षकांवर लोकांचा सर्वाधिक विश्वास असतो. मुलांमधले कलागुण जोपासण्याबरोबर अभ्यासात मागे राहणार्‍यांना आत्मविश्वास देणं हे शिक्षकाचं कर्तव्य असतं. आयुष्यातला पहिला पुरस्कार स्नेहालयाच्या भूमीत मिळाला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा