प्रा.भानुदास बेरड भाजपाच्या राज्य संयोजन समितीवर

नगर -  भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकर्ता प्रशिक्षण संयोजन समितीमध्ये नगरच्या प्रा.भानुदास बेरड यांची प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे. या समितीत राज्यातील 11 जणांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये प्रा.भानुदास बेरड यांची नियुक्ती विशेष मानली जाते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते  या मुलभुत घटकांचे अधिकाधिक प्रभावी प्रशिक्षण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील पक्षातील अनुभवी अशा पदाधिकार्‍यांनी संयोजन समिती गठीत  करण्यात आली आहे.

     प्रा.भानुदास बेरड हे यापुर्वी पक्षाचे सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले असून, सध्या भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध पातळ्यांवर होणार्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण,  नियोजन, गोवा राज्याच्या विधान सभा निवडणुकीतही प्रा.बेरड यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा