मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २७.९.२०२३
मुख्य शहर हद्दीतील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात गणपतीची स्थापना केली जाते. स्थापनेपासून नवव्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. त्यामुळे आज ता.२७ रोजी गणेश विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी प्रमुख अधिकारी व महिला पुरूष पोलिस कर्मचारी भगवे फेटे बांधून मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते. पोलिस जीप बॉनेटवर श्रीगणेशाची मुर्ती ठेवण्यात आली होती.
बँडपथकाच्या तालावर नृत्य करत पोलिस बांधव विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले होते. नागरिकाही या मिरवणुकीकडे कौतुकाने पहात होते. उद्या शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक असल्याने पोलिस बांधवांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. नागरिकांनी मुख्य विसर्जन मिरवणूकीत पोलिस बांधवांना सहकार्य करावे.
Post a Comment