धार्मिक उन्मादात आपण देशाची आर्थिक स्थिती कुठं नेऊन ठेवलीय याचा विचार करा.

भारताचे माजी अर्थसचिव श्री.सुभाष चंद्र गर्ग यांनी पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच नाव आहे ‘ We Also Make Policy ‘ 

काय आहे या पुस्तकात ? 

१४ सप्टेंबर २०१८ रोजी एका मिटिंगमध्ये ‘ रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर श्री.उर्जित पटेल हे ‘ धनावर बसलेले नाग ‘ आहेत ‘ अशी टिप्पणी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केली. 

देशाची नाजूक आर्थिक स्थिती आणि सरकारचा रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे मागण्यासाठी सुरु असलेला पाठपुरावा यांची पार्श्वभूमी या वादाला होती. 

काय आहे नेमक प्रकरण ? 

बँकांना व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा होते जी “ राखीव निधी “ म्हणून सुरक्षित ठेवली जाते.

रिझर्व्ह बँकेकडे असलेली हि गंगाजळी आहे किंवा होती ९ लाख कोटी रुपयांची. 

म्हणजेच हे सगळे पैसे तुम्ही आम्ही इमानइतबारे केलेल्या व्यवसायातून, बँकिंग मधून भरलेले आहेत अर्थातच करदात्यांचे पैसे आहेत. 

राखीव निधी हे नावच हा निधी आपत्कालीन स्थितीत वापरायचा असल्याचे स्पष्ट करत. 

यशस्वी नोटाबंदी ,यशस्वी जीएसटी आणि घोडदौड करणारी अर्थव्यवस्था असताना सरकारला हे ९ लाख कोटी नेमके कशाला हवे होते ? 

हि गंगाजळी देण्यास नकार दिल्याने उर्जित पटेल घरी गेले आणि इतिहासाचे पदवीधर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. महोदयाना एवढा राग आला की त्यांनी उर्जित पटेलांना ' धनावर बसलेला नाग ' म्हटलं तेही मीटिंगमध्ये.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेम्बर २०१८ मध्ये नेमलेल्या समितीने अंतिम अहवाल दिला. 

“ येत्या पाच वर्षात हे ९ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने सरकारला सुपूर्द करावेत “ 

धक्कादायक बाब म्हणजे हा आपत्कालीन राखीव निधी पूर्वी ६.४ टक्के होता तो घटवून ५.५ टक्के करावा अशीही शिफारस समितीने केलेली आहे. 

आता रिझर्व्ह बँकेकडून सरकारने घेतलेले पैसे, रिझर्व्ह बँकेने पैसे दिलेले नाहीत, सरकारने घेतलेत हे लक्षात ठेवा. 

२०१४-२०१५ – ६५८९६ कोटी 
२०१५-२०१६ – ६५८७६ कोटी 
२०१६-२०१७ – ३०६५९ कोटी 
२०१७-२०१८ – ५०००० कोटी 
२०१८-२०१९ – ९९१२२ कोटी 
२०१९-२०२० – ५७१२८ कोटी 
२०२०-२०२१ – ९९१२२ कोटी 
२०२१-२०२२ – ३०३०७ कोटी 
२०२२-२०२३ – ८७१४६ कोटी 

एकूण रक्कम झाली ५८५२५६ कोटी. 

मग फक्त एवढेच पैसे रिझर्व्ह बँकेकडून घेतलेत का ? तर त्याच उत्तर ' नाही ' .

रिझर्व्ह बँक सरकारला नफ्यातून डिव्हिडंड देते. त्या पैशाचा हिशोब वेगळाच. 

२००६-२०१४ या कालावधीत सरकारने १०१६७९ कोटी रुपये घेतले.

म्हणजे सध्याच्या सरकारने सहापट पैसे जास्त घेतलेत. 

इंधनाच्या करातून मिळालेली रक्कम, जीएसटीची रक्कम, वेगवेगळ्या कंपन्या विकून मिळालेली रक्कम, विमानतळ- रेल्वे यांच्या खाजगीकरणातून मिळालेली रक्कम नेमकी कुठे कमी पडली म्हणून रिझर्व्ह बँकेकडून पैसे घ्यावे लागलेत ? 

एवढे लाखो कोटी रुपये नेमके कुठे गेलेत ? 

लसीकरण करायला ३६००० कोटी लागणार होते, रस्त्याची काम सगळीच बीओटी तत्वावर आहेत जिथे आपल्याला टोल भरायचा आहेच. 

मग नेमके पैसे कुठे गेलेत ?

वेगवेगळ्या काळात आलेल्या आर्थिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली कारण रिझर्व्ह बँकेची त्याकाळात असलेली मजबूत स्थिती आणि २८ टक्के असलेली गंगाजळी. 

आता जर असा मंदीचा फेरा आला किंवा जगभरात आर्थिक अरिष्ट आले तर भारताची अवस्था काय होईल ?

धार्मिक उन्मादात आपण देशाची आर्थिक स्थिती कुठं नेऊन ठेवलीय याचा विचार करा.

आनंद शितोळे

#रिझर्व्ह_बँकेवर_दरोडा 

#गंगाजळी

#सीधी_बात 

#सब_बिक_जायेगा

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा