मख़दूम समाचार
पुणे (प्रतिनिधी) २०.९.२०२३
मोदींनी नवीन संसदेत प्रवेश करतांना वाटलेल्या संविधान प्रतींमधून Secular ज्याचा अर्थ आपण 'धर्मनिरपेक्ष' व Socialist म्हणजे 'समाजवाद' म्हणतो हे दोन शब्द संविधानातून वगळणे हा गुन्हेगारी खोडसाळपणा आहे. हे शब्द मान्य नाहीत की संकल्पनाच अमान्य आहेत? असा सवाल राष्ट्रीय हरित लवाद बार असोशिएशनचे उपाध्यक्ष ॲड. असिम सरोदे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणतात की, संघ, मोदी, भाजपला Secular 'धर्मनिरपेक्ष' व Socialist म्हणजे 'समाजवाद' या संकल्पनाच अमान्य असतील तर संविधानिक सुधारणा amendments करून तसे बदल जरूर करून घ्यावेत. पण संविधानाच्या प्रती छापताना मुद्दाम हे शब्द वगळणे हा संविधानाचा अपमान आहे. संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान असतो. कायद्याचा, नियमांचा व संविधानिक प्रक्रियांचा नेहमी अपमान करायचा आणि बहुमत आहे त्याचा गैरवापर करायचा यातून प्रस्थापित होणारी संविधानिक अनैतिकता लोकशाहीला हानीकारक आहे याची दखल प्रत्येक भारतीय नागरिकाने घ्यावी.
त्यांनी पुढे म्हटले की, मी भारतीय नागरिक व भारतीय संविधानाबद्दल बोलतोय. जे केवळ राजकीय पक्षांचे सदस्य आहेत त्यांना हा विचार समजणार नाही.
إرسال تعليق