मख़दूम समाचार
अहमदनगर (श्रीनिवास बुरगूल) २०.९.२०२३
गणेश उत्सवानिमित्त एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथे श्री एकदंत गणेश मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात गणरायचे स्वागत करण्यात आले. यावेळी एकदंत कॉलनीतील शिरसुल परिवाराच्यावतीने श्रींची विधीवत पुजाअर्चा करुन महाआरती करण्यात आली. गणेश चतुर्थीनिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी गणेश मंडळाच्यावतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले. परिसरातील विद्यार्थ्यांना व महिलांना अभिव्यक्तीसाठी हक्काचा मंच मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली.
यावर्षी मंडळाच्यावतीने बुधवार ता. २० सप्टेंबर रोजी लिंबू चमचा स्पर्धा, गुरुवारी २१ रोजी बादलीत बॉल टाकने, शुक्रवारी २२ रोजी एक मिनिट शो, शनिवारी २३ रोजी महिलांसाठी संगीत खुर्ची व पाककला, रविवारी २४ रोजी सत्यनारायण महापूजा होईल व त्यानंतर महिलांसाठी उखाणे स्पर्धा, सोमवारी २५ रोजी विडी वळविणे असे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व स्पर्धा सायं. ७.३० वा. आरती झाल्यानंतर होतील.
स्पर्धांमधे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री एकदंत गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
◾
आपली भुमिका
...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.
إرسال تعليق