अहमदनगर महाविद्यालयात ऑनलाईन राष्ट्रीय लघुकथा लेखन कार्यशाळा संपन्न


मख़दूम समाचार
अहमदनगर (सा.सु) २०.९.२०२३
    हिंदी दिनानिमित्त अहमदनगर कॉलेजच्या हिंदी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राष्ट्रीय लघुकथा लेखन ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. ता. १६ रोजी कार्यक्रमास दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक, लघुकथा लेखक, समीक्षक आणि संपादक डॉ. बलराम अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी लघुकथा आणि कथा यातील फरक स्पष्ट केला, लघुकथेच्या घटकांवर प्रकाश टाकला आणि शीर्षक लेखन आणि लघुकथा लेखनासाठी आवश्यक प्रतीकात्मकता यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती दिली.
    ता. १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील इंदौर येथील लघुकथा लेखिका आणि अनुवादक  अंतरा करवडे अतिथी मार्गदर्शक म्हणून कार्यशाळेत सामील झाल्या. लघुकथा लेखनाच्या संदर्भात प्रयोगशीलता आणि माध्यम, प्रतीकात्मकता, भाषा इत्यादी प्रचलित पद्धतींचा विचार कसा करावा याबाबत त्यांनी कार्यशाळेत उपस्थितांना अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.  दोन्ही दिवशी लघुकथेबाबत अतिशय रंजक आणि अचूक माहिती मिळाली.
   कार्यक्रमात अमेरिकेचे प्रदीप वाघ, इंग्लंडचे डॉ.वंदना मुकेश, जयपूरच्या अनिता सैनी, भोपाळचे मनोरमा पंत आणि देश-विदेशातील लघुकथा लेखकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रिचा शर्मा, डॉ.पूर्णिमा बेहेरे, प्रा.चेतन रवेलिया व प्रा.सबिना शेख आदी उपस्थित होते.
   ता. १६ च्या कार्यशाळेत पाहुण्यांचे स्वागत चेतन रवेलिया, प्रास्ताविक अध्यक्ष डॉ.रिचा शर्मा, उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रीतम बेदरकर तर पाहुण्यांचा परिचय डॉ. पूर्णिमा बेहेरे यांनी तर आभार प्राध्यापिका सबिना शेख यांनी मानले. ता.१७ च्या पाहुण्यांचे स्वागत डॉ. पूर्णिमा बेहेरे, प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. ऋचा शर्मा,  उपप्राचार्य प्रा.नोएल पारगे, पाहुण्यांचा परिचय चेतन रवेलिया व आभार सादिया शेख यांनी केले.





Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा