लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रशिक्षित ग्रासरूट जर्नालिझमची महत्वपूर्ण भूमिका – माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन; सीएसआरडीमध्ये कार्यशाळा संपन्न


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) ९.९.२०२३
    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता तथा माध्यमांनी नैतिकता जपणे  गरजचे असून पत्रकारितेच्या हातामध्ये लोकशाही जपण्याची मौलिक जबाबदारी आहे,  ग्रासरूट जर्नालिझम हे समृद्ध व प्रगल्भ लोकशाहीचे उत्तम उदाहरण असून लोकशाहीच्या बळकटीसाठी ग्रासरूट जर्नालिझमची सद्याच्या परिस्थितीत महत्वपूर्ण भूमिका आहे. माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव झाला आहे. काळाच्या ओघात इंटरनेटचे वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत. या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आला आहे. आता याचाच खुबीने वापर करत दुर्लक्षित घटकातील व्यथा, वेदना, त्यांचे प्रश्न आणि कधीही समोर न येणारे विषय सर्वसामान्य नागरिकांना ग्रासरुट जर्नलालिझमच्या माध्यमातून जगासमोर आणण्याची संधी आहे. हे करत असताना प्रामाणिकता आणि विश्वासार्हताही जपावी, अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या वतीने ग्रासरूट जर्नालिझम : संधी व उपयोगिता याविषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेदरम्यान जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे, पुणे येथील वरिष्ठ पत्रकार पंकज इंगोले, न्यु आर्ट्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागाचे डॉ.बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेस जिल्हास्तरावरील माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी डॉ.गव्हाणे म्हणाले, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारिता बळकट होणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पत्रकारितेला व्यापकता यावी. सर्वसामान्य माणूस त्याचे प्रश्न जेंव्हा स्वत: जगासमोर मांडेल तेंव्हाच हे स्वरुप व्यापक होईल. आजपर्यंत जगातील बहुतांशी ब्रेकिंग न्यूज या सर्वसामान्यांच्या माध्यमातूनच समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करावयाचे तर याचे प्राथमिक प्रशिक्षण, निर्भिड आणि निपक्ष:पातीपणे काम करण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.

अभिजीत कांबळे यांनी संवाद साधतांना सांगितले कि, डिजिटल माध्यमातून ग्रासरुट जर्नालीझम करण्याची चांगली संधी आहे. याची सुरुवात करत असताना तंत्रज्ञानाचे बारकावे आत्मसात करावेत. दुर्लक्षित घटकातील एखाद्या ज्वलंत विषयाची धोरणात्मक मांडणी करावी. यातून सरकारी पातळीवर दखल घेऊन तो प्रश्न मार्गी लागला जाऊ शकतो. प्रत्येकाला स्वत:चे चॅनेल अथवा वृत्तपत्र सुरू करणे शक्य नाही मात्र, सोशल माध्यमातून आपण पत्रकारितेची सुरुवात करून सामाजात विश्वासार्हता निर्माण करून त्याला व्यापक स्वरुप देऊ शकतात. तुमच्या माध्यमाची लोकप्रियता वाढली तर यातून आर्थिक उत्पन्नही मिळते.  जे जमिनीस्तरावरील, तळागाळातील विषय आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्यासंबंधीचे विषय मांडणे म्हणजे ग्रासरूट जर्नालिझमची होय, त्यामुळे पत्रकारांनी बातम्या करत असतांना  सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. वेबसाईट, सोशल मिडिया, फेसबुक, यूट्यूब ह्या डिजिटल माध्यमातून ग्रासरूट जर्नालिझम प्रभावीपणे करता येते परंतु त्यासाठी पत्रकारितेचे मुलभूत प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. ग्रासरूट जर्नालिझमच्या अनुषंगाने देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील झालेल्या विविध प्रयोगाविषयी उदाहरण देत स्पष्ट केले. प्रत्येकाची बातमी लिखानाची पद्धत वेगळी असते वाचक वर्ग वेगळा असतो त्यामुळे कोणाची लिखाण करतांना कॉपी करू नये, स्वतःची वेगळी शैली निर्माण करावी असे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रास्ताविक करतांना डॉ.सुरेश पठारे म्हणाले कि, अहमदनगर जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभलेला आहे. ग्रासरूट जर्नालिझमचे आदर्श मॉडेल्स अहमदनगर जिल्ह्याने दिले आहेत. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत कशा पद्धतीने पत्रकारिता करता येऊ शकते याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. ग्रासरूट जर्नालिझमच्या अनुषंगाने माध्यम क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याची माहिती व्हावी या दृष्टीकोनातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

तळागाळातील समुदायाचे प्रश्न समजून घेण्यासाठी संवेदनशील व प्रभावशाली पत्रकार घडवणे गरजेचे आहे, या अनुषंगाने प्रशिक्षणाची गरज लक्षात घेवून सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत या वर्षापासून जर्नालिझम व मास कम्युनिकेशन या विषयाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे. या अभ्यासक्रमासाठी नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली असून सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम तीन स्तरावर असणार असून विद्यार्थ्यांना एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स, दोन वर्षाचा डिप्लोमा तर तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम अश्या स्वरुपात पूर्ण करता येणार आहे. किमान बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्याशाखेच्या विध्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. आजच्या काळात पदवीबरोबरच कौशल्यास विशेष महत्व आहे. ज्यांच्याकडे प्रभावी कौशल्य असतील त्यांना करिअरच्या अनेक संधी मिळतात, त्यामुळे हि गरज लक्षात घेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने कौशल्य विकासावर आधारित अभ्याक्रम विद्यापीठे आणि महाविद्यालयात सुरु व्हावेत यासाठी बी.होक. या योजनेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांची सुरवात केली आहे. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी हा उत्तम पर्याय विध्यार्थ्यांकडे असणार आहे त्यामुळे माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी सदर कोर्ससाठी प्रवेश घ्यावा असे आवाहन डॉ.सुरेश पठारे यांनी केले.

कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात प्रश्नोत्तरेच्या स्वरुपात चर्चासत्र पार पडले, अनेकांनी आपल्या शंका व प्रश्न विचारत संवाद साधला. मान्यवरांनी अनेकांच्या शंकांचे निरसन केले. आभार डॉ. सुरेश मुगुटमल यांनी मानले तर सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सीएसआरडी संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा