निष्ठूर फडणवीसांनी मराठ्यांची माफी मागत राजीनामा द्यावा : कुमटकर

निष्ठूर फडणवीसांनी मराठ्यांची माफी मागत राजीनामा द्यावा : कुमटकर

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने एक दिवसाचे अन्नत्याग 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निषेध करण्यासाठी अहमदनगर शहरातील स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कालच रात्रीपासून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बोलताना संघटनेचे धिरज कुमटकर म्हणाले यावर एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून मराठ्यांवर तुटून पडणा-या दोषींवर कायमस्वरूपीच्या निलंबनाची कार्यवाही करावी.मराठा समाजातील महिला व बालकांवर लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला. महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत ५८ मराठा मोर्चे जगात आदर्श ठरले. मग अंतरवाली सराटीचे आंदोलन चिरडण्यासाठी इतका आततायी कृत्य का असा प्रश्नही कुमटकर यांनी उपस्थित केला.गृहमंत्री फडणवीसांनी ब्रिटिशांप्रमाणे वागत निष्ठूरता दाखवली आहे त्यामुळे त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असेही धिरज कुमटकर म्हणाले.विनीत गाडे शुभम पांडूळे आणि यशवंत तोडमल यांनी विद्यार्थ्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अमोल गाडे,डॉ अमित पवार, डॉ गणेश जंगले गजानन भांडवलकर, निलेश म्हसे,प्रविण गांगर्डे,मयुर ढगे,हेमंतराव मुळे,राजेंद्र ससे आदिंसह मराठा समाजातील नागरिक सहभागी झाले होते. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा