अहमदनगर - सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. यावेळी राज्यात सर्वत्र पाऊस पडावा, यासाठी अल्लाकडे प्रार्थना करताना म्हटले की, "ईश्वर,अल्लाह समस्त मानव जातीसाठी, पशू- पक्ष्यांकरिता जिथे जिथे पाऊस नाही तेथे फायदा देणारा पाऊस पडू दे.समस्त जातीला त्रास होईल इतकाही त्रास देऊ नको, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हा सर्वांना माफ कर, आम्हा सर्वांवर दया कर.आमचे शेतकरी चिंतेत आहे.आम्हाला आणि मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही,नफा देणारा भरपूर पाऊस पडू दे, प्रत्येक मनुष्य आकाशाकडे डोळे लावून आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आहेत. हे ईश्वरा समस्त जिवांवर कृपा कर" अशी आर्तपणे प्रार्थना करत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.तसेच भारताची प्रगती आणि देशात शांतता नांदावी यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली.यावेळी अहमदनगर येथील सर्व मस्जिदचे मौलाना आदींसह हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق