मख़दूम समाचार
वर्धा (प्रतिनिधी) ४.९.२०२३
येथील शासकीय विश्रामभवनात राज्यपाल रमेश बैस यांनी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. प्रतिकूल स्थितीतही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 'मेडीटेशन'सारखे उपक्रम राबवावेत. जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे राज्यपालांनी सांगितले.
जिल्ह्यातील सिंचन, कृषि, खरीप हंगामाची स्थिती व विविध शासकीय योजनांची माहिती व प्रगती तसेच आदिवासी घटकासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, शाळाबाह्य मुले, ग्रामपंचायत भवन, ग्रामसभा आदींची माहिती राज्यपालांनी जाणून घेतली.
यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.
إرسال تعليق