मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १०.९.२०२३
येथील महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना कै.तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते भाऊसाहेब कबाडी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर, नगरसेवक धनंजय जाधव, डॉ.सुदर्शन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातून १२ शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली होती.
कै.तुकाराम गोरे गुरुजी पुरस्कार समिती व लायन्स क्लब मिलेनियम अहमदनगर यांच्या वतीने बंधन लॉन्स अहमदनगर येथे पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या ओंकारनगर शाळेत पटसंख्या वाढवणे, लोकसहभागातून शाळेत सुसज्ज भौतिक सुविधा निर्माण करणे, शाळेला आय.एस.ओ.मानांकन मिळवणे, शाळेत सहशालेय उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देणे, शाळेला स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत फाइव्ह स्टार मानांकन मिळवून देणे अशी कामगिरी केली. त्यामुळे ओंकारनगर शाळेचा कायापालट झाला.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कविता वाघमारे, उपाध्यक्ष प्रियंका लोळगे, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, सर्व पालक, विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
Post a Comment