मख़दूम समाचार
अहमदनगर (महेश कांबळे) २४.९.२०२३
फक्त गणेशोत्सवात नव्हे तर वर्षभर विविध उपक्रम राबवून गोरगरीब रुग्णांना मदत करण्याचे काम सिद्धेश्वर मंडळाच्या वतीने करण्यात येते त्याचे अनुकरण सर्व मंडळांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. तोफखान्यातील जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या गणपतीची आरती, वैद्यकीय मदत कक्षचा माहितीफलक अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव, अभिमन्यू जाधव, मितेश शहा, आदिनाथ जाधव, शिवदत्त पांढरे, ज्ञानेश्वर दौंडकर, सुनील सुडके, स्वप्नील अंकम, पांडुरंग गोणे, अभय मडूर, पुरुषोत्तम सब्बन, सचिन उदगीरकर, राहुल मुथा, तुकाराम रामगिरी, सोमनाथ जाधव, राम खारगे, राहुल दिवाणे, राहुल गोंधळे, अक्षय संभार, ओंकार बीडकर, ऋषिकेश बीडकर, श्रीकांत उदगीरकर, साई तिरिध्दे, तेजस गोणे, कृष्णा म्याना आदी उपस्थित होते.
ते म्हणाले मंडळाचे राजूमामा जाधव, धनंजय जाधव व कार्यकर्ते हे मंडळाच्या व साई द्वारका ट्रस्ट व हेल्प मी इंडियाच्या मार्फत रूग्णांना मदत करत आहेत. आतापर्यंत १० कोटींच्यावर मदत त्यांनी रुग्णांना मिळवून दिली म्हणून त्यांना कोविडयोद्धा पुरस्कार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. असे समाजपयोगी व गोरगरिबांसाठी काम सर्व मंडळांनी केले पाहिजे.
Post a Comment